IPL 2024 KKR vs DC: कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्याआधी शाहरुख खानचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सोशल मीडियावर रंगली चर्चा
IPL 2024 KKR vs DC: कोलकाता संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Delhi Capitals: आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत कोलकाताचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. या सामन्याआधी कोलकाता संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोलकात्याच्या उष्णतेमुळे शाहरुख खानची अवस्था वाईट झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान वारंवार चेहरा पुसताना आणि पाणी पिताना दिसत आहे. नेटकरी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. आयपीएलमध्ये शाहरुख खान त्याच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या जवळपास प्रत्येक सामन्यात दिसतो. आज कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ भिडणार आहेत.
SRK can't handle the heat of Kolkata at all.. Taqleef saaf saaf dikh rha pic.twitter.com/l6piEr8w3x
— ℣αɱριя౯ 2.1.0 (@Revamped_SRKC) April 28, 2024
गुणतालिकेत कोलकाता नाइट रायडर्सचा संघ कुठे?
सध्या कोलकाता नाइट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे 8 सामन्यांत 10 गुण आहेत. आतापर्यंत या संघाने 5 सामने जिंकले आहेत, मात्र 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सविरुद्ध 261 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती, मात्र असे असतानाही गोलंदाज बचावात अपयशी ठरले. पंजाब किंग्सने 262 धावांचे लक्ष्य केवळ 18.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. आता या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध दोनदा खेळणार आहे. याशिवाय केकेआर संघ लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरेल.
कोलताना नाइट रायडर्सची संभाव्य Playing XI:
फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट खेळाडू- वैभव अरोरा
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI:
पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट खेळाडू- रसिक दार सलाम
संबंधित बातम्या:
ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे...टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसन आघाडीवर, मोठी अपडेट समोर