ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे...टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसन आघाडीवर, मोठी अपडेट समोर
ICC T20 WC 2024: आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या 15 खेळाडूंची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
ICC T20 WC 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. तर दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत. आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
न्यूझीलंड संघाने टी 20 विश्वचषकासाठी आजच संघ जाहीर केला आहे. आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या 15 खेळाडूंची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भारतीय संघात रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांची नावं जवळपास निश्चित झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतची निवड निश्चित असल्याचं देखील बोललं जात आहे. परंतु आता नवीन माहिती समोर आली आहे. यष्टीरक्षकाच्या स्पर्धेत ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे, तर संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आहे. आयपीएलमध्ये केएल राहु, ऋषभ पंतपेक्षा संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच सध्या सॅमसन चांगल्या फॉर्मात आहे. मात्र संजू सॅमसनची निवडीबाबत अजूनही निर्णय झाला नसल्यामुळे अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच संजू सॅमसनला संघात सामील करण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जात आहे.
Sanju Samson likely to be India's first-choice wicketkeeper in the T20 World Cup. (EspnCricinfo). pic.twitter.com/GPX1sZmhnA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 29, 2024
संजू सॅमसनची आयपीएलमधील कामगिरी-
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. सॅमसनने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 385 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीत संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानी केएल राहुलचाही समावेश आहे.
मी सर्वकाही करण्यास तयार...- दिनेश कार्तिक
आरसीबीची सांघिक कामगिरी चांगली नसली तरी दिनेश कार्तिकची वैयक्तिक कामगिरी आतापर्यंत दमदार राहिलेली आहे. विशेषत: शेवटच्या षटकांत फलंदाजीसाठी येऊन दिनेश कार्तिक स्फोटक फलंदाजी करत आहे. याचपार्श्वभूमीवर आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघात दिनेश कार्तिकला संधी मिळणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या निवडीवरुन दिनेश कार्तिकने स्वत: याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. आयुष्याच्या या वळणावर भारतीय संघात पुनरागमन करणं यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. अजित आगरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्माने माझा विचार केल्यास टी-20 विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी मी 100 टक्के तयार असल्याचे दिनेश कार्तिकने सांगितले.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा