(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 KKR Gautam Gambhir: 'ज्याचे विचार अन्...' कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
IPL 2024 KKR Gautam Gambhir: कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरनेही सोशल मीडियावर एक श्लोक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
IPL 2024 KKR Gautam Gambhir: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनला. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि संघ तसेच मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरचे खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान गौतम गंभीरनेही सोशल मीडियावर एक श्लोक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
गौतम गंभीरने X वर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये "ज्याचे विचार आणि हालचाली सत्याच्या आहेत त्याचा रथ आजही श्री कृष्णाने चालवला आहे", असं गंभीर म्हणाला. विशेष म्हणजे ही पोस्ट गंभीरने मध्यरात्री 2.33 वाजता शेअर केली. त्याच्या या पोस्टवर जगभरातून चाहते कमेंटद्वारे कौतुक करत आहे.
“जिसकी मति और गति सत्य की हो,
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) May 26, 2024
उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं”
गंभीर केकेआरमध्ये परतला अन्...
गंभीर केकेआरमध्ये आल्यानंतर फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही बदल झालेला दिसत होता. गंभीरने सुनील नरेनला सलामी दिली. याचा संघाला खूप फायदा झाला. त्याने 15 सामन्यात 488 धावा केल्या. या काळात त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली. गंभीरने आपल्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्यावर दडपण येऊ दिले नाही. संघाने संपूर्ण हंगामात त्याचे फायदे पाहिले.
सुनील नरेनची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवड-
महत्त्वाची बाब म्हणजे कोलकाताचा खेळाडू सुनील नरेनची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवड करण्यात आली. नरेनने अष्टपैलूची भूमिका बजावली. धावा करण्यासोबतच त्याने विकेट्सही घेतल्या. नरेनने 15 सामन्यात 17 विकेट घेतल्या. केकेआरसाठी फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने 12 सामन्यात 435 धावा केल्या. अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 113 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 10.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले.
गौतम गंभीर अन् चंदू पंडितचं डोकं -
मैदानावर श्रेयस अय्यरच्या संघाने शानदार खेळी करत चषकावर नाव कोरले. पण या विजयामध्ये मेंटॉर गौतम गंभीर आणि कोच चंदू पंडित यांचाही सिंहाचा वाटा आहे. या जोडगोळीने अचूक प्लॅन आखात हैदराबादचा बाजार उठवला. मैदानाबाहेरुन या दोघांनी युक्त्या लढवत, खेळाडूंना मार्गदर्शन केले. हैदराबादच्या प्रत्येक खेळाडूविरोधात या दोघांनी प्लॅन आखला होता, त्या प्लॅनवर श्रेयस अय्यरच्या संघाने काम केले.