एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

रोहित शर्मा शेकहँड करायला गेला, हार्दिक पांड्यानं गळ्यात मिठी मारली, व्हिडीओ व्हायरल!

Mumbai Indians IPL 2024 : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची भेट होईल तेव्हा काय होईल? असा प्रश्नही चाहत्यांना सतावत होता.

Rohit Sharma Vs Hardik Pandya IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला  22 मार्चपासून सुरु होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरातविरोधात होणार आहे. या हंगामात मुंबईचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माची हाकालपट्टी करत हार्दिककडे धुरा सोपवल्यानंतर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याशिवाय अनेक माजी खेळाडूंनीही मुंबईच्या निर्णायावर बोट ठेवलं होतं. आयपीएलमध्ये रोहित शर्मा खेळणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची भेट होईल तेव्हा काय होईल? असा प्रश्नही चाहत्यांना सतावत होता. मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात आजी आणि माजी खेळाडूंची भेट झाली, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची भेट झाली. या भेटीवेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रोहित शर्माला पाहिल्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्याकडे गेला... हार्दिक पांड्या आल्याचं पाहिल्यानंतर रोहित शर्मा शेकहँड करायला गेला. पण हार्दिक पांड्यानं रोहित शर्माच्या गळ्यात गळा घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी ही दोस्ती तुटायची नाही, असं म्हटलेय. तर काहींनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पाहा व्हायरल व्हिडीओ - 

17 वर्षात पहिल्यांदाच घडणार असं - 

आयपीएल 2024 आधी  कर्णधार म्हणून मुंबईने रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्याची निवड केली. मगील 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यंदाच टीम इंडियाचा कर्णधार आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्याचा फटका मुंबईला बसलाय. सोशल मीडियावरुन त्यांचे फॉलोअर्स कमी झाले. त्याशिवाय चाहत्यांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येतेय. 

हार्दिक पांड्याकडे मुंबईचं नेतृत्व 

आयपीएल 2024 आधी मिनी लिलाव पार पडला होता. त्याआधीच मुंबईने ट्रेड विंडोद्वारे हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने दोन वर्षांत शानदार कामगिरी केली होती. गुजरातने 2022 आणि 2023 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातला जेतेपदही मिळालं होतं. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्याची आयात केली. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. 

मुंबई इंडियन्सचं सुरुवातीच्या सामन्याचं वेळापत्रक - (Mumbai Indians Time Table) 
GT vs MI,  गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता

SRH vs MI, सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता

MI vs RR,  मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता

MI vs DC,  मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

Mumbai Indians (MI) Squad : मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी,  नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा 

Mumbai Indians Players: Akash Madhwal, Arjun  Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (C), Gerald Coetzee, Nuwan Thushara, Dilshan Madushanka, Mohammad Nabi,Shreyas Gopal, Naman Dhir, Anshul Kamboj,Shivalik Sharma  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget