एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal : आयपीएलच्या इतिहासातील 'यशस्वी' कामगिरी, दिग्गजांचा विक्रम मोडला

Yashasvi Jaiswal: पंजाब विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने 36 चेंडूंमध्ये 56 धावा करत 625 धावांची मजल मारली आहे. तर एका हंगामात एवढ्या धावा करत 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Yashasvi Jaiswal: राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघाने पंजाबचा पराभव करुन प्ले ऑफच्या शर्यतीमधली आपली जागा टिकवून ठेवली आहे. या यशाचं श्रेय यशस्वी जयस्वालला ( Yashasvi Jaiswal) दिलं जात असून त्याने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने 36 चेंडूंमध्ये 56 धावा करत सामना राजस्थानच्या बाजूने वळवला. याचबरोबर यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील रेकॉर्ड मोडला आहे. यशस्वीने आयपीएलच्या या हंगामात 600 धावांची खेळी केली आहे. या हंगामात अशी दमदार खेळी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. या कामगिरीच्या जोरावर यशस्वी आयपीएलच्या या हंगामातील सगळ्यात जास्त धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. 

अनकॅप्ड खेळाडू म्हणजे जो खेळाडू अजून देशासाठी खेळाला नाही आहे. जयस्वालने अजून भारतीय संघात पदार्पण केले नाही आहे. त्यामुळे या दमदार कामगिरीमुळे त्याने भारतीय संघात प्रवेश घेण्यासाठी आगेकूच केली आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानचा फलंदाज यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली आहे. आता यशस्वी ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये 625 धावांसह शुभमन गीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. यशस्वीने 14 सामन्यांमध्ये 48.08 सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत या हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतकांची यशस्वी कामगिरी केली आहे. यशस्वीने आयपीएलच्या या हंगामात 163 च्या स्ट्राइकरेटने 625 धावांची मजल मारली आहे. 

मोडला 15 वर्षांचा आयपीएल इतिहास

याचबरोबर यशस्वीने आयपीएलच्या या हंगामात गेल्या 15 वर्षांचा इतिहास मोडला आहे. पंधरा वर्षांपूर्वी आस्ट्रेलियाचा खेळाडू शेन मार्शने (Shen Marsh) एका आयपीएलच्या हंगामात 616 धावांची मजल मारली होती. मार्श 2008 दरम्यान अनकॅप्ड खेळाडू होता. पंजाब विरुद्धच्या सामन्यात यशस्वीने अर्धशतक करत या आयपीएलच्या हंगामातील 625 धावांची मजल मारली आहे. त्याने मार्शचा रेकॉर्ड मोडला असून 15 वर्ष मार्शचा हा रेकॉर्ड कोणीच मोडला नव्हता. पंरतु 21 वर्षाच्या एका भारतीय मुलाने मार्शचा हा रेकॉर्ड मोडला आहे. 

सर्वाधिक स्ट्राइकरेटने धावा करणाऱ्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक स्ट्राइकरेट बनवणाऱ्यांच्या यादीमध्ये यशस्वीने चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. क्रिस गेल हा 183.13 च्या स्ट्राइकरेटने पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर रिषभ पंत असून त्याने 2018 च्या आयपीएल हंगामात 173.6 च्या स्ट्राइकरेटने धावा केल्या होत्या. तर 2016 मध्ये बंगळूरच्या संघासाठी 168.8 च्या स्ट्राइकरेटने धावा करणारा एबी डिविलियर्स हा तिसऱ्या स्थानावर आहे. तर या सगळ्यानंतर राजस्थानच्या यशस्वीने चौथ्या क्रमांकावर स्थान मिळावले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Orange & Purple Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 'यशस्वी' जयस्वाल, शमी आणि राशिदमध्ये पर्पल कॅपसाठी शर्यत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP MajhaCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget