हैदराबादने पराभवाचा वचपा काढला, दिल्लीला 9 धावांनी हरवले
DC vs SRH IPL 2023 : मिचेल मार्श आणि फिल साल्ट यांच्या अर्धशतकानंतरही दिल्लीचा 9 धावांनी पराभव
DC vs SRH, IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 188 धावांपर्यंत मजल मारला. दिल्लीचा पराभव करत हैदराबादने वचपा काढला. लीग फेरीतील पहिल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा पराभव केला होता. दिल्लीकडून फिल साल्ट आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकी खेळी केली. तर हैदराबादकडून मयांक मार्केंडय याने भेदक मारा केला.
हैदराबादने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला कर्णधार डेविड वॉर्नर खातेही न उघडता तंबूत परतला. भुवनेश्वर कुमार याने वॉर्नरला बाद करत हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्श आणि साल्ट यांनी दिल्लीचा डाव सावरला.
मिचेल मार्श आणि फिल साल्ट वादळी फलंदाजी केली. दोघांनी 112 धावांची भागिादरी करत दिल्लीच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मिचेल मार्श याने29 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीत मार्श याने सहा षटकार आणि एक चौकार लगावला. तर फिल साल्ट याने 35 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. या खेळीत साल्ट याने 9 खणखणीत चौकार लगावले. साल्ट याला मार्केंडे याने तंबूत पाठवले तर मिचेल मार्श याला अकील हुसेन याने बाद केले.
मार्श-साल्ट जोडी बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अखेरीस अक्षर पटेल याने आक्रमक फंलदाजी केली पण इतरांची साथ मिळाली नाही. साल्ट-मार्श बाद झाल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केली. मनिष पांडे एक धाव, प्रियम गर्ग 12, सर्फराज खान 9 यांना मोठी खेळी करता आली नाही. अक्षर पटेल याने अखेरीस 14 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. तर रिपल पटेल याने 11 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून मयंक मार्कंर्डेय याने चार षटकात अवघ्या 20 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा, टी नटराजन, अकिल हुसेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दरम्यान, अभिषेक शर्मा याचे वादळ आणि कालसन याच्या झंझावाताच्या बळावर हैदाराबादने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा आणि हेनरिक कालसन यांनी वादळी खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने चार विकेट घेतल्या.
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक -
सलामी फलंदाज अभिषेक शर्मा याने वादळी अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या डावाला आकार दिला. एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्मा याने हैदराबादची धावसंख्या वाढवली. अभिषेक शर्मा याने 36 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्माने मयंकासोबत 21, त्रिपाठीसोबत 23, एडन मार्करमसोबत 39 आणि कालसनसोबत 26 धावांची भागिदारी केली.
कालसनचा फिनिशिंग टच -
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर हेनरिक कालसन याने सर्व सुत्रे हातात घेतली. कालसन याने धावांचा पाऊस पाडला. कालसन याने अब्दुल समदसोबत 33 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. हैदराबादकडूनची ही सर्वात मोठी भागिदारी होय. अब्दुल समद बाद झाल्यानंतर अकिल हुसेन याच्या साथीने हैदराबादच्या डावाला फिनिशिंग टच दिला. हेनरिक कालसन याने अर्धशतकी खेळी केली. कालसन याने 27 चेंडूत नाबाद 53 धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत कालसन याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अब्दुल समद याने 21 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. अकिल हुसेन याने 10 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार लगावला.
कर्णधारासह दिग्गज फ्लॉप -
हैदराबादच्या दिग्गज फंलदाजांनी नांगी टाकली. मयंक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. मयंक अग्रवाल याला फक्त पाच धावा काढता आल्या. तर राहुल त्रिपाठी फक्त दहा धावा काढून तंबूत परतला. कर्णधान एडन मार्करम यालाही मोठी खेळी करता आली नाही. एडन मार्करम याला फक्त आठ धावा करता आल्या. यासाठी मार्करम याने 13 चेंडू घेतले. हॅरी ब्रूक याला खातेही उघडता आले नाही. ब्रूक याला मार्श याने तंबूत धाडले.
मिचेल मार्श याचा भेदक मारा -
दिल्लीकडून मिचेल मार्श याने भेदक मारा केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मिचेल मार्श याने हैदराबादच्या फंलदाजांना तंबूत धाडले. मिचेल मार्श याने चार षटकात 27 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मिचेल मार्श याने एक षटक निर्धाव टाकले. अक्षर पटेल याने 4 षटकात 29 धावा देत एक विकेट घेतली. ईशांत शर्मालाही एक विकेट मिळाली. नॉर्खिया, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांची विकेटची पारी कोरीच राहिली.