एक्स्प्लोर

Shubman Gill : पंजाबच्या वाघाची बॅटेतून डरकाळी, शुभमन गिलचा अंदाजच न्यारा

शुभमन गिलच्या वादळी खेळामुळे मुंबई इंडियन्सच्या फायनलमध्ये पोहोचायच्या इराद्यावर पाणी फेरलं गेलं. 

IPL 2023 : शुभमन गिल या तरण्याबांड क्रिकेटपटूचं सध्या सर्वजण तोंड भरून कौतुक करत आहेत. त्याचं कौतुक का करू नये? 26 मे रोजी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली कामगिरी अगदी तुफानी होती. किंबहुना मुंबईला आयपीएलच्या फायनलमध्ये जाण्यापासून रोखण्याची धाडसी कामगिरी शुभमनने केली म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या 26 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये चुरशीची लढत झाली. कारण यातून विजेता संघ फायनलला चेन्नईशी दोन हात करण्यासाठी जाणार होता. अशातच गुजरातच्या टीमने सुरुवातील बॅटिंग करताना 233 ची खेळी केली. त्यात शुभमनचा वाटा होता 129 धावांचा.

अगदी आकड्याच्या भाषेत बोलायचं तर शुभमनने अवघ्या 60 बॉलमध्ये 129 धावा झोडून काढल्या होत्या. हो झोडूनच म्हणावं लागेल कारण त्याने पहिल्या 32 बॉलमध्ये अर्धशतक मारलं. त्यानंतर पुढच्या 17 बॉलमध्ये 50 धावा काढल्या. आणि हे कमी म्हणून की काय शेवटच्या 11 बॉलमध्ये 29 धावा काढल्या. शुभमनच्या बॅटिंगमध्ये इतका आत्मविश्वास होता की मुंबई इंडियन्सचे सर्व बॉलर हतबल झाले होते. हा पठ्ठ्या कुठल्या बाजूला चेंडू सीमापार करेल, याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. त्याने मुंबई इंडियन्सच्या प्रत्येकाला सळो की पळो करून सोडलं होतं.

आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगाम. या हंगामात शुभमनची कामगिरी जबरदस्त आहे. रॉयल चॅलेन्जर बेंगलोरचा विराट कोहली, राजस्थानचा जोस बटलर यांच्या पाठोपाठ शुभमनचा नंबर आहे. विराट कोहलीने 16 सामन्यांत 4 शतकांसह 973 धावा काढल्यात. जोसने17 सामन्यात 4 शतकांसह 836 धावांची कमाई केली आहे. तर शुभमने 16 सामन्यात 3 शतके काढली आहे आणि एकूण 851 धाव काढल्या आहेत.

पंजाबच्या या 24 वर्षांच्या वाघानं ट्वेन्टी-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्ममध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. मैदानात आक्रमक असलेला शुभमन मैदानाबाहेर आला की अगदी साधासुधा असतो. शांतपणे खु्र्चीवर बसतो आणि इतरांच्या खेळण्याचा आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य इतकं लोभसवाणं असतं की कुणीही त्याच्या प्रेमात पडावं. म्हणूनच मुंबई इंडियन्सविरोधातील त्याच्या कामगिरीचं सचिन तेंडुलकरलाही कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

यंदाचा आयपीएलचा सीझन शुभमन गिलने त्याच्या तडाखेबाज बॅटिंगने गाजवला. शुभमनची एक स्टाईल सर्वांचंच लक्ष वेधून घेते. त्याने अर्धशतक किंवा शतकी खेळी केली की तो कमरेतून वाकून प्रेक्षकांना अभिवादन करतो, त्याची ही लकब आता खूप लोकप्रिय झाली आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकही त्याच्यावर फिदा आहेत. पंजाबच्या प्रथम श्रेणी, त्यानंतर19 वर्षांखालील संघ, पुढे टीम इंडियात निवड झालेल्या शुभमनची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे, ही भारतासाठी खूप जमेची बाजू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget