एक्स्प्लोर

IPL 2023, KKR vs RR : यशस्वीने केकेआरच्या गोलंदाजांची कत्तल केली, राजस्थानचा 9 विकेटने विजय

KKR vs RR, Match Highlights: युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फंलदाजीच्या जोरावर राजस्थानने सहज विजय मिळवला.

KKR vs RR, Match Highlights: युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फंलदाजीच्या जोरावर राजस्थानने सहज विजय मिळवला. कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान राजस्थानने नऊ विकेट आणि 41 चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. राजस्थानचा हा सहावा विजय होय.. या विजयासह राजस्थानने आघाडीच्या चार संघामध्ये स्थान पटकावलेय. राजस्थानचे 12 गुण झाले आहेत. राजस्थानला प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय अनिवार्य आहे. 

कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान पार करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली.  पहिल्याच षटकात यशस्वी जायस्वाल याने 26 धावांचा पाऊस पाडला. पण दुसऱ्याच षटकात जोस बटलर तंबूत परतला. जोस बटलर याला एकही धाव काढता आली नाही. तो धावबाद झाला.. जोस बटलर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याच्या मदतीने यशस्वीने राजस्थानला विजय मिळवून दिला. अवघ्या 69 चेंडूत या दोघांनी 121 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याचे योगदान 71 होते तर संजूचे योगदान 48 इतके होते. 

21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. यशस्वी जयस्वाल याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक होय. यशस्वी जायस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जयस्वास याने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वी जयस्वाल याने पाच षटकार आणि 12 चौकार लगावले. 

कर्णधार संजू सॅमसन यानेही वादळी फलंदाजी करत यशस्वीला चांगली साथ दिली. संजू सॅमसन याने अवघ्या 29 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या जोडीपुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. कोलकात्याच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. अनुकूल रॉय, सुयेश शर्मा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर, हर्षित राणा आणि नीतीश राणा यांना विकेट घेण्यात अपयश आले.  

युजवेंद्र चहलचा भेदक मारा, कोलकात्याला 149 धावांत रोखले -

युजवेंद्र चहल याच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकात्याने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. चहल याने विकेटचा चौकार लगावला.  

वेंकटेश अय्यरची एकाकी झुंज 

एका बाजूला विकेट पडत असताना वेंकटेश अय्यर याने कोलकात्याचा किल्ला सांभाळला. ईडन गार्डन्स मैदानावर वेंकटेश अय्यर याने संयमी फलंदाजी करत कोलकात्याच्या डावाला आकतार दिला. अय्यरचा अपवाद वगळता एकाही फलंदालाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेंकटेश अय्यर याने 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत अय्यरने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. वेकंटेश अय्यरने कर्णधार नीतीश राणा याच्यासोबत 37 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली.  रसेलसोबत 19 चेंडूत 30 धावांची भागिदारी केली. रिंकू सिंह याच्यासोबत 20 धावांची भागिदारी केली. 

खराब सुरुवात - 

प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात अतिशय खराब झाली. जेसन रॉय याला बोल्टने स्वस्तात तंबूत धाडले. जेसन रॉय याला फक्त दहा धावांचे योगदान देता आले. जेसन रॉय या्चयानंतर गुरबाजही लगेच तंबूत गेला. गुरबाजलाही बोल्टने बाद केले. गुरबादने 18 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. 

आरआरआर फ्लॉप -

कोलकात्याचे आरआरआर आज फ्लॉप गेले. कर्णधार राणा याला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राणा याने 17 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. तर रसेल याने 10 चेंडूत 10 धावा केल्या... यामध्ये एक षटकार लगावला. रिंकू याला करिष्मा दाखवता आला नाही. रिंकू 16 धावांवर तंबूत परतला.. या खेळीत त्याने एक षटकार लगावला. कोलकात्याचे आरआरआर फ्लॉप गेल्यामुळे धावसंख्येला लगाम लागला.. 

इतरांची कामगिरी कशी - 

आघाडीची फळी फ्लॉप गेल्यानंतर मध्यक्रम आणि तळाची फलंदाजीही ढेपाळली. शार्दूल ठाकूर, अनुकूल रॉय आणि सुनील नारायण यांना मोठी खेळी करता आली नाही. शार्दूल ठाकूर याला अवघ्या एका धावेचे योगदान देता आले. ठाकूर यंदाच्या आयपीएलमध्ये लयीत दिसत नाही. आरसीबीविरोधात एक वादळी अर्धशतकानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. वेकंटेश अय्यरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या करता आली नाही. अनुकूल रॉय आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी सहा धावांचे योगदान दिले. 

चहल चमकला -

राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. कोलकात्याच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने तंबूत पाठवले. ट्रेंट बोल्ट याने कोलकात्याला सुरुवाता दोन धक्के दिले.. त्यानंतर चहल याने एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. बोल्ट याने तीन षटकात 15 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. केएम आसिफ यानेही एक विकेट घेतली. आसिफ याने तीन षठकात 27 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.  संदीप शर्माला एक विकेट मिळाली. युजवेंद्र चहल याने आज पुन्हा भेदक मारा केला. चहल याने कोलकात्याचा मध्यक्रम तोडला.. चहल याने चार षटकात अवघ्या 25 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. चहल याने यासह आयपीएल सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. चहलने ब्राव्होचा विक्रम मोडीत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget