CSK vs RR, 1 Innings Highlights : जोस बटलरचे अर्धशतक, चेन्नईला विजयासाठी 176 धावांचे आव्हान
IPL 2023, CSK vs RR: जोस बटलर याच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात 8 विकेटच्या मोबद्लयात 175 धावांपर्यंत मजल मारली आहे.
IPL 2023, CSK vs RR: जोस बटलर याच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात 8 विकेटच्या मोबद्लयात 175 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना ठरावीक अंताराने बाद केले. चेन्नईला विजयासाठी 20 षटकात 176 धावांचे आव्हान दिले. जो संघ आजचा सामना जिंकेल, त्याला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.
जोस बटलरची सावध खेळी -
सलामी फलंदाज जोस बटलर याने सावध फलंदाजी केली. यशस्वी जायस्वल बाद झाल्यानंतर जोस बटलर याने संयमी फलंदाजी केली. बटलर याने ५२ धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. जोस बटलर याने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते.
शिमरोन हेटमायरचा फिनिशिंग टच -
पुन्हा एकदा शिमरोन हेटमायर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत राजस्थानला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. हेटमायर याने अखेरच्या दोन षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत फिनिशिंग केली. पण अखेरच्या षटकात तुषार देशपांडे याने भेदक मारा केला. तुषारच्या गोलंदाजीसमोर हेटमायरला मोठे फटके मारता आले नाही. हेटमायर याने १८ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले.
ध्रृव जुरेल आजच्या सामन्यातही स्वस्तात तंबूत परताला. त्याला फक्त चार धावा काढता आल्या. आकाश सिंह याने त्याला तंबूत धाडले. जेसन होल्डर शून्यावर बाद झाला.. त्याला तुषार देशपांडे याने तंबूत पाठवले. अॅडम जॅम्पाही धावबाद झाला.
अश्विन-पडिक्कलची प्रभावी खेळी -
देवदत्त पडिक्कल आणि आर अश्विन याने प्रभावी फलंदाजी केली. दोघांनीही राजस्थानच्या धावसंख्येला आकार दिला. जोस बटलर संयमी फलंदाजी करत असताना दोघांनीही दुसऱ्या बाजूने धावा केल्या. देवदत्त पडिक्कल याने ३८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने पाच चौकार लगावले. तर आर अश्विन याने ३० धावांचे योगदान दिले. यामध्ये अश्विन याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. जोस बटलर आणि पडिक्कल यांनी ७१ धावांची भागिदारी केली तर अश्विन आणि बटलर यांनी ४७ धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीमुळे राजस्थानच्या धावसंख्येला आकार मिळाला. यशस्वी जायस्वाल याला आज मोठी खेळी करता आली नाही. जायस्वाल दहा धावावर तुषार देशपांडेचा शिकार झाला.. तर संजू सॅमसन याला खातेही उघडता आले नाही.
जाडेजाचा भेदक मारा -
अष्टपैलू रविंद्र जाडेजा याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांना धावा तर दिल्याच नाहीत.. उलट दोन जणांना तंबूत पाठवले. जाडेजाने चार षटकात अवघ्या २१ धावा खर्च केल्या अन् दोन विकेट घेतल्या. जाडेजाने संजू सॅमसन याला तर खातेही उघडू दिले नाही. संजू सॅमसन गोल्डन डक झाला. तर जम बसलेलल्या देवदत्त पडिक्कल यालाही झेलबाद करत तंबूत पाठवले.
चेन्नईकडून जाडेजाव्यतिरिक्त इतर गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आळे. आकाश सिंह याने चार षटकात चाळीश धावा मोजत दोन विकेट घेतल्या. तर महेश थिक्ष्णा याने चार षटकात ४२ धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. मोईन अली याने दोन षटकात २१ धावा देत एक विकेट घेतली. सिसंदा मागला याने दोन षटकात १४ धावा दिल्या. तुषार देशपांडे यालाही दोन विकेट मिळाल्या पण त्याने चार षटकात ३७ धावा खर्च केल्या.