IPL 2023 : दिल्लीविरोधात आरसीबीची ताकद वाढली, हुकमी एक्का संघात परतला
IPL 2023 : एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये लढत होणार आहे.
Royal Challengers Banglore vs Delhi Capitals : एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये लढत होणार आहे. दिल्लीचा संघ बेंगलोरमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दिल्लीला अद्याप एकाही लढतीत विजय मिळवता आलेला नाही. तर दुसरीकडे आरसीबीला तीन सामन्यात एक विजय आणि दोन पराभव मिळाले आहेत. पण आता दिल्लीविरोधात आरसीबीची ताकद आणखी वाढणार आहे. श्रीलंकेचा आघाडीचा गोलंदाज वनिंदु हसरंगा आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. हसरंगामुळे आरसीबीची ताकद आणखी वाढणार आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात आरसीबीची फिरकी गोलंदाजी अतिशय कमकुवत जाणवत होती. पण हसरंगाच्या आगमनामुळे आरसीबीची ताकद वाढणार आहे. दिल्लीविरोधात आरसीबी हसरंगाला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू वनिंदु हसरंगा आरसीबीच्या ताफ्यात जोडला गेलाय. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेमुळे हसरंगा सुरुवातीच्या काही सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. पण आता दिल्लीविरोधातील सामन्यासाठी हसरंगा उपलब्ध असेल. हसरंगाच्या आगमनामुळे आरसीबीचा संघ आधीपेक्षा जास्त मजबूत दिसत आहे. गेल्या हंगमात हसरंगाने दमदार प्रदर्शन केले होते. आरसीबीला त्याने काही सामन्यात विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीशिवाय हसरंगा तळाला विस्फोटक फलंदाजीही करतो..त्यामुळे आरसीबीसाठी हसरंगा गेम चेंजर ठरू शकतो.
हसरंगाने आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामिगरी केली आहे. हसरंगाने 18 डावात 7.78 च्या इकॉनॉमीने 26 विकेट घेतल्या आहेत. हसरंगाची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी असते. गोलंदाजीशिवाय हसरंगा तळाला फलंदाजीत योगदानही देऊ शकतो. अखेरच्या षटकात मोठे फटकेबाजी मारण्यात हसरंगा पटाईत आहे. हसरंगामुळे आरसीबीची ताकद आणखी वाढणार आहे. दिल्लीविरोधात हसरंगाला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
Wanindu Hasaranga said - "I am bowling well and I am hitting well in batting. And I am ready to go". pic.twitter.com/g9N5ZI8kq4
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 13, 2023
Wanindu Hasaranga has joined RCB. pic.twitter.com/G0Um7GGxOp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
Virat Kohli against Wanindu Hasaranga in the nets. pic.twitter.com/zjn2T2j4Py
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2023
DC vs RCB Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.