Rajasthan Royals ची सुरुवात दणक्यात, मग चुकले काय? रॉयल्स कुठे कमी पडले
IPL 2023, Rajasthan Royals : पहिल्या टप्प्यात राजस्थानने सातपैकी सहा सामन्यात विजय मिळवला होता. राजस्थानचा संघ गुणतालिकेत आघाडीवर होता.
IPL 2023, Rajasthan Royals : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात एकमद रॉयल केली होती. साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात राजस्थानने सातपैकी सहा सामन्यात विजय मिळवला होता. राजस्थानचा संघ गुणतालिकेत आघाडीवर होता. पण दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सने खराब कामगिरी केली. राजस्थानला दुसऱ्या टप्प्यात सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय.
राजस्थानची फलंदाजी -
राजस्थानकडून यंदा यशस्वी जायस्वाल याने सर्वाधिक धावा चोपल्या. अनकॅप यशस्वीने 14 सामन्यात 625 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये एक शतक आणि पाच अर्दशतकांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल याने यंदा 13 चेंडू अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक होय. यशस्वी जयस्वालचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जोस बटलर याने 392, संजू सॅमसन याने 362, शिमरोन हेटमायर 300 धावा चोपल्या आहेत. देवदत्त पडिक्कल याने 236 धावांचे योगदान दिले. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 10 फलंदाजामध्ये राजस्थानचा एकमेव फलंदाज आहे.
गोलंदाजी कशी राहिली -
युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन या जोडीने यंदा दमदार कामगिरी केली. यो जोडीने 35 विकेट घेतल्या आहेत. युजवेंद्र चहल याने 21 विकेट घेतल्या. तर अश्विन याने 14 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने 10 डावात 13 विकेट घेतल्या. संदीप शर्मा यानेही 10 विकेट घेतल्या. चहल-अश्विनचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. मूळात इतर गोलंदाजांना तितकी संधी मिळालीच नाही. राजस्थानची गोलंदाजी स्थिर राहिली नाही.. चहल-अश्विन वगळता प्रत्येकवेळा गोलंदाजीत बदल पाहायला मिळाला.
काय कमावले -
यंदा राजस्थानच्या दोन खेळाडूंनी सर्वांनाच प्रभावित केले.. यामध्ये पहिले नाव यशस्वी जयस्वाल याचे आहे. यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. तर फिनिशर म्हणून ध्रुव जुरेल याने सर्वांनाच प्रभावित केले. ध्रुव जुरेल याने 11 डावात 152 धावा चोपल्या. या धावा 173 च्या स्ट्राईक रेटने काढल्या. त्याने 9 षटकार आणि 11 चौकार लगावलेत. अखेरच्या दोन ते तीन षटकात फलंदाजी करत ध्रुव जुरेल याने अनेकदा राजस्थानसाठी बाजी पलटवली आहे.
काय चुकले -
सुरुवातीला मिळालेली लय राजस्थानला कायम राखता आली नाही. यशस्वी वगळता इतरांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याशिवाय कर्णधार म्हणून संजू सॅमसन याचे अनेक निर्णय चुकले. त्याशिवाय तो फलंदाजीतही अपयशी ठरला. संजू सॅमसन याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट फेकली.. याचाच फटका आरसीबीला बसलाय. त्याशिवाय ट्रेंट बोल्टसाठी वेगवान गोलंदाजाला सर्व सामन्यात खेळवले नाही.. गोलंदाजीत सतत बदल करण्यात आला. बोल्टला फक्त 10 सामन्यात संधी दिली.. संदीप शर्मा 12, जेसन होल्डर 8 सामन्यात खेळलाय.. इतर संघाप्रमाणे राजस्थानचा संघ स्थिर वाटला नाही.