IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहलीने कॉनवे आणि वॉर्नरला टाकलं मागे, पर्पल कॅप सिराजकडे; पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
IPL 2023 Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऑरेंज कॅप (Orange Cap) सध्या फाफ डु प्लेसिसकडे तर, पर्पल कॅप (Purple Cap) मोहम्मद सिराजकडे आहे.
IPL Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (IPL 2023 Orange Cap) विराट कोहलीने (Virat Kohli) म्हणजेच यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उडी घेतली आहे. कोहलीने डेवॉन कॉनवेने (Devon Conway) आणि डेव्हिड वॉर्नरला (David Warner) मागे टाकलं आहे. कोलकाता (KKR) विरुद्धच्या सामन्यातील दमदार अर्धशतकी खेळीमुळे विराट कोहली ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 26 एप्रिलच्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यातील 37 चेंडूत 57 धावांच्या खेळीमुळे कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकाहून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या म्हणजेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. डु प्लेसिसने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये एकूण 422 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑरेंज कॅप डु प्लेसिसकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीने आठ सामन्यांमध्ये 333 धावा केल्या आहेत. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकातील दोन्ही खेळाडूंमध्ये सुमारे 100 धावांचा फरक आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर डेवॉन कॉनवे आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 314 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये 306 धावा केल्या आहेत. व्यंकटेश अय्यर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 8 सामन्यांमध्ये 285 धावा केल्या आहेत.
क्र. | टॉप 5 फलंदाज | धावा |
1. | फाफ डु प्लेसिस | 422 |
2. | विराट कोहली | 333 |
3. | डेवॉन कॉनवे | 314 |
4. | डेव्हिड वॉर्नर | 306 |
5. | व्यंकटेश अय्यर | 285 |
IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील (Royal Challengers Bangalore) गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) राशिद खानकडून (Rashid Khan) पर्पल कॅप (Purple Cap) हिसकावून घेतली होती. तो सर्वाधिक 14 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल आहे. अर्शदीप सध्या पर्पल कॅपचा (IPL 2023 Purple Cap) मानकरी आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान (Rashid Khan) आहे. दरम्यान सिराज आणि राशिद या दोघांनीही 14 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघातील अर्शदीप सिंह आहे. त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.
क्र. | टॉप 5 गोलंदाज | विकेट |
1. | मोहम्मद सिराज | 14 |
2. | राशिद खान | 14 |
3. | अर्शदीप सिंह | 13 |
4. | वरुण चक्रवर्ती | 13 |
5. | तुषार देशपांडे | 12 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :