
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023, GT vs DC Playing 11 : दिल्लीच्या मैदानावर गुजरातची कसोटी, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार? प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत जाणून घ्या...
Delhi Capitals and Gujarat Titans : आयपीएल 2023 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (DC) घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स (GT) विरोधात पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.

GT vs DC, Playing 11 : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघात लढत पाहायला मिळणार आहे. हा दोन्ही संघाचा दुसरा सामना असेल. आयपीएल 2023 मधील पहिल्या सामन्यात पांड्याच्या नेतृत्त्वात गुजरातने चेन्नईवर विजय मिळवला होता. तर दिल्लीला लखनौविरोधातील सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली खातं उघडण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरणार आहे. तर, गुजरातचं लक्ष्य सलग दुसरा विजय मिळवण्यावर असेल.
DC vs GT, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 3 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
GT vs DC Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.
GT vs DC Probable Playing XI : संभाव्य प्लेईंग 11
GT Playing XI : गुजरात संभाव्य प्लेइंग 11
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ
DC Playing XI : दिल्ली संभाव्य प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
तुम्ही सर्व आयपीएल 2023 (IPL 2023) सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता आणि Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवर स्ट्रीमिंग पाहू शकता. मोबाइल युजर्स Jio सिनेमा वेबसाइटवर सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
