(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनीने नाणेफेक जिंकली, चेन्नईमध्ये दोन बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Premier League 2023 Match 17, Toss Update: चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वालीत राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसनलाही पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी खेळपट्टी अधीक पोषक होईल. नाणेफेकीचा कौल धोनीने जिंकलाय... धोनीने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. प्रिटोरियस आणि मिचेल सँटनर यांना धोनीने आराम दिला आहे. राजस्थानने कुलदीप सेन याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे...
चेन्नई सुपर किंग्स – डेवोन कानवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), सिसांदा मगाला, महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, अकाश सिंह.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जायस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
Here are the @ChennaiIPL & @rajasthanroyals line-ups for this mouthwatering clash 👌 🔽
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
Follow the match ▶️ https://t.co/IgV0ZtiJJA#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/YkQFmiSsRa
धोनीला स्पेशल अवॉर्ड -
एमएस धोनी आज चेन्नईसाठी २०० व्या सामन्यात नेतृत्व करत आहे. एखाद्या संघासाठी दोनशे सामन्यात नेतृत्व सांभाळणारा धोनी एकमेव आहे. त्यामुळे धोनीला खास अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येत आहे.
दीपक चाहर बाहेर -
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर आजच्या सामन्यातून बाहेर असेल. चाहरला मागील सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो आजच्या सामन्याला मुकणार आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अध्याप समोर आलेले नाही.
MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.