कोलकात्याला मोठा धक्का, आयपीएल अर्ध्यावर सोडून खेळाडू परतला मायदेशी
IPL 2023 : विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या कोलकात्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Indian Premier League 2023 : विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या कोलकात्या संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगालादेशचा विस्फोटक फलंदाज लिटन दास कौटुंबिक कारणामुळे मायदेशात पतरला आहे. विकिटकीपर फलंदाज लिटन दास याची उर्वरीत आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, लिटन दास याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चार मे पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली होती. त्या कालावधीला आता फक्त आठवड्याभराचा कालावधी उरलाय.
28 वर्षीय लिटन दास याला कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामासाठी 50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. आतापर्यंत त्याला फक्त एका सामन्यात संधी दिली आहे. त्या एकमेव सामन्यात लिटन दासला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्या एकमेव सामन्यात लिटन दास याला फक्त चार धावा काढता आल्या होत्या. आता लिटन दास कौटुंबिक कारणामुळे मायदेशात पतरला आहे. त्यानंतर तो आयरलँडविरोधातील तीन वनडे सामन्याच्या मालिकेत बांगलादेशच्या संघासोबत रवाना होणार आहे. कोलकात्याकडून जारी केलेल्या स्टेसमेंटनुसार, कौटुंबिक कारणामुळे आज सकाली लिटन दास बांगलादेशला जावे लागले. कठीण परिस्थितीत आम्ही दासच्या कुटुंबासोबत आहोत.
Litton Das left KKR camp due to a family emergency.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2023
आतापर्यंत कोलकात्याची खराब कामगिरी -
आयपीएलचा सोळावा हंगाम अर्धा संपला असून उत्तरार्धाकडे आगेकूच केली आहे. आतापर्यंत कोलकात्याच्या संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोलकात्याचा संघला आठ सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आलेले आहेत. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. कोलत्याच्या नावावर सहा गुण आहेत. कोलकात्याला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवाला लागणार आहे. प्लेऑफच्या स्पर्धेत टिकण्यासाटी कोलकात्याला पुढील प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे.
Just In: Litton Das had to return to Bangladesh due to an urgent family medical emergency.#LittonDas #KKR #IPL2023 #Cricket pic.twitter.com/LEnL9fZisZ
— Wisden India (@WisdenIndia) April 28, 2023
KKR fans giving farewell to Litton Das. 😹 pic.twitter.com/TUKpYH90BO
— Arijit (FAN) (@SRKsArijit) April 28, 2023
🚨 OFFICIAL: Litton Das is coming back to Bangladesh tonight. He won’t be available for the remainder of the IPL. pic.twitter.com/zNkVetAYMD
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) April 28, 2023
The unpleasant journey of Litton Das comes to an end!
— Playbuzz BD (@PlaybuzzBD) April 28, 2023
Litton Das is leaving KKR camp due to Family Emergency ‼️ #IPL pic.twitter.com/hAci52IC71
শুক্রবার কলকাতা নাইট রাইডার্সের তরফে জানিয়ে দেওয়া হল, বাংলাদেশে ফিরে গিয়েছেন লিটন#ipl2023 #IPL #LittonDas #KKRhttps://t.co/QT7IdZ57q2
— ABP Ananda (@abpanandatv) April 28, 2023
कोलकाता नाईट राइडर्स ने घोषणा की है कि बांग्लादेश के विकेटकीपर बल्लेबाज लिटन दास तत्काल पारिवारिक चिकित्सा जरूरत के कारण शुक्रवार को स्वदेश रवाना हो गए।#LittonDas pic.twitter.com/9xRjQHJmcH
— IANS Hindi (@IANSKhabar) April 28, 2023