एक्स्प्लोर

सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षक बनवा, दिल्ली कॅपिटल्सला इरफानचा सल्ला

DC, IPL 2023 : 12 सामन्यात दिल्लीला फक्त चार विजय मिळवता आलेत.

Indian Premier League 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीचे आव्हान संपुष्टात आलेय. यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाने लाजीरवाणी कामगिरी केली. 12 सामन्यात दिल्लीला फक्त चार विजय मिळवता आलेत. प्रत्येक क्षेत्रात दिल्लीने हारकिरी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाला भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण याने लाखमोलाचा सल्ला दिलाय.  माजी अष्टपैलू इरफान पठाण याने सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा सल्ला दिलाय. 

दिल्ली कॅपिटल्स संघाने मार्च 2023 मध्ये सौरव गांगुलीला संचालक म्हणून नियुक्त केले होते. या अंतर्गत गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाच्या वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची कामगिरी पाहणार आहे. यामध्ये वुमन्स प्रीमियर लीगशिवाय दक्षिण अफ्रीका टी20 लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्स आणि आयएलटी 20 मधील दुबई कॅपिटल्स या संघाचा सहभाग आहे. इरफान पठाणने स्टार स्पोर्ट वाहिनीवर बोलताना सौरव गांगुलाला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा दिल्लीला सल्ला दिलाय. गांगुलीमुळे दिल्लीच्या संघात मोठा बदल होईल. दादा भारतीय खेळाडूंची मानसिकता चांगल्या पद्धनीने ओळखतो. ड्रेसिंग रुममधील वातावरणही दादामुळे चांगले होईल. भारतीय संघाचा कर्णधार असताना दादाने अनेक खेळाडूंना घडवलेय.. त्याचप्रमाणे तो आताही दिल्लीसाठी चांगली कामगिरी करु शकतो. 

 आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली होती. दिल्लीने सुरुवातीचे पाच सामने गमावले होते. त्यानंतर दिल्लीला पहिला विजय मिळाला होता. ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत दिल्लीचा संघ कमकुवत जाणवत होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत दिल्लीच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. डेविड वॉर्नर, ऋषभ पंत, मिचेल मार्श, मनिष पांडे, सर्फराज खान यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. डेविड वॉर्नर याने सुरुवातीला धावा केल्या पण स्ट्राईक रेट खूपच कमी होता. दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपलेले आहे.

दिल्ली या संघाचे गणित बिघडवणार ?

दिल्लीला 11 सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण दिल्ली इतर संघाचे प्लेऑफमधील गणित बिघडवू शकते. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. यापैकी दोन सामने पंजाबविरोधात आहेत.. तर एक सामना चेन्नईसोबत आहे. 13 मे आणि 17 मे  रोजी दिल्ली पंजाबसोबत भिडणार आहे.  20 मे रोजी दिल्ली पुन्हा एकदा चेन्नईसोबत दोन हात करणार आहे.  

दिल्लीच्या पराभवाची कारण काय आहेत ?

डेविड वॉर्नर याचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंजाला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, यश धुल, मनीष पांडे यांच्यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीच्या पराभवाचे हेही प्रमुख कारण असू शकते. डेविड वॉर्नर याला प्रभावी नेतृत्व करता आले नाही. दिल्लीच्या पराभवाचे खराब नेतृत्व हेही एक कारण आहे. वॉर्नरने गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. कुलदीप यादव याला कधी गोलंदाजी द्यायची, यात वॉर्नरची मोठी चूक होतेय.. गतवर्षी कुलदीपने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या... त्याशिवाय भन्नाट फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल याला फलंदाजी बढती दिली जात नाही.. अन्यथा तो आणखी धावा जमवू शकेल. प्रमुख गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीपचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. एनरिख नॉर्खिया लयीत दिसत नाही.. याचा फटका दिल्लीला बसत आहे. ऋषभ पंतची कमी दिल्लीला जाणवत आहे. ऋषभ पंतचे आक्रमक नेतृत्व आणि फलंदाजीची कमी दिल्लीला जाणवतेय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget