एक्स्प्लोर

गुजरातची नजर प्लेऑफच्या तिकीटावर; दोम्ही संघ 'या' प्लेईंग 11 सह मैदानात उतरण्याची शक्यता

IPL 2023, SRH vs GT: IPL 2023 मध्ये आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे संघ आमनेसामने असतील.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) 62 वा सामना आज (15 मे) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे. आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हार्दिक पांड्याच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जर गुजरात संघाने हा सामना जिंकला तर IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ बनेल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादसाठी हा सामना केवळ औपचारिक आहे. एडन मार्करामच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणं खूप कठीण आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेऊयात... 

पॉईंट टेबलची परिस्थिती काय? 

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.

प्लेऑफवर गुजरातची नजर

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सर्व काही...

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती लाल आणि काळ्या मातीनं बनलेली आहे. दुसरीकडे, काळी माती थोडी घन असते तर लाल माती थोडी मऊ असते. या मैदानावर फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार यात काही शंकाच नाही. 

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11 

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11

ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11

अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, ट नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आयपीएलच्या मैदानात गुजरात टायटन्स अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार; पाहा हेड-टू-हेड आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget