(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs SRH, 1 Innings Highlights: गिलचे शतक, पण भुवनेश्वरच्या 5 विकेटने गुजरातला रोखले; हैदराबादला विजयासाठी 189 धावांची गरज
भुवनेश्वर कुमार याने अखेरच्या षटकात फक्त दोन धावा खर्च केल्या. शुभमन गिल याने आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले.
GT vs SRH, IPL 2023 : शुभमन गिल याने शतकी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमार याच्या भेदक माऱ्यामुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेटमुळे हैदराबादने गुजरातला 188 धावांवर रोखले. भुवनेश्वर कुमार याने अखेरच्या षटकात फक्त दोन धावा खर्च केल्या. शुभमन गिल याने आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले.
शुभमन गिलचे दमदार शतक -
गुजरातचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली. शुभमन गिल याने संयमी फलंदाजी करत गुजरातचा डाव सावरला.. शुभमन गिल याने साई सुदर्शनसोबत गुजरातच्या डावाला आकार दिला. एका बाजूला विकेट पडत असताना शुभमन गिल याने शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याने 56 चेंडूत शतकी खेळी केली. शुभमन गिल याने 13 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याची खेळी भुवनेश्वर कुमार याने 101 धावांवर संपुष्टात आणली.
साई सुदर्शनची दमदार खेळी -
साई सुदर्शन याने संयमी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. साहा बाद झाल्यामुळे पहिल्याच षटकात साई सुदर्शनला मैदानावर यावे लागले.. साई सुदर्शन याने संयमी फलंदाजी करत गुजरातच्या डावाला आकार दिला. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी 146 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या शतकी भागिदारीमुळे गुजरातच्या डावाला आकार मिळाला. साई सुदर्शन याने 36 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने एक चौकार आणि सहा षटकार लगावले.
गिल-साई सुदर्शनची दमदार भागिदारी -
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वृद्धीमान साहा याला माघारी धाडले. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 चेंडूत 147 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीच्या जोरावर गुजरातच्या डावाला आकार मिळाला. 147 धावांच्या भपागिदारीमध्ये शुभमन गिल याने 48 चेंडूत 89 धावांचे योगदान दिले. तर साई सुदर्शन याने 36 चेंडूत 47 धावा जोडल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची भागिदारी गुजरातसाठी निर्णायक ठरली.
गुजरातची फलंदाजी ढेपाळली -
गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. वृद्धीमान साहा याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हार्दिक पांड्या यालाही मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्या आठ धावांवर बाद झाला. यामध्ये त्याने एक चौकार लगावला. डेविड मिलर यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. मिलरने एका चौकारासह सात धावांचे योगदान दिले. राहुल तेवातियाही फ्लॉप ठरला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो तीन धावा काढून बाद झाला. गुजरातने लागोपाठ विकेट गमावल्या. गुजरातला फिनिशिंग करता आले नाही. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या गेल्या. अखेरच्या षटकात गुजरातने चार विकेट घेतल्या... दोन धावा देत 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमार याने चार विकेट घेतल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केलेल्या फलंदाजीवर इतर फलंदाजांनी पाणी फेरले. दोघांनी पाया रचला होता... पण इतर फलंदाजांनी गुडघे टेकले.
भुवनेश्वर कुमारचा पावर पंच -
भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा करत गुजरातच्या धावसंख्या रोखली. भुवनेश्वर कुमार याने 4 षटकात 30 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. अखेरच्या 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमार याने तीन विकेट घेतल्या आणि एका फलंदाजाला धावबाद केले. या षटकात भुवनेश्वर कुमार याने फक्त दोन धावा दिल्या. भुवनेश्वर कुमार याचा अपवाद वगळता इतर गोलंदाजात मार्को जानसेन , फारुकी आणि नटराजनक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.