एक्स्प्लोर

'हम तो डूबेंगे ही सनम....'  दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय, लिव्हिंगस्टोनच्या 94 धावा व्यर्थ

IPL 2023, PBKS vs DC : दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे  प्लेऑफचे आव्हान खडतर झालेय.

IPL 2023, PBKS vs DC : दिल्लीने पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ आठ विकेटच्या मोबद्लयात 198 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकीही झुंज दिली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय अथर्व तायडे यानेही संयमी अर्धशतक झळकावले. दिल्लीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. दिल्लीचा संघ 10 गुणावर पोहचलाय. दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे  प्लेऑफचे आव्हान खडतर झालेय. पंजाबचा एक सामना बाकी आहे, त्या सामन्यात जरी विजय मिळवला तरी ते 14 गुणांपर्यंत मजल मारतील. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर पंजाबचे प्लेऑफचे आव्हान अवलंबून असेल.

214 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली.  कर्णधार शिखर धवन शून्यावर बाद झाला. अमन खान याने धवनचा जबराट झेल घेतला. कर्णधार माघारी परतल्यानंतर युवा अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी पंजाबचा डाव सावरला. दोघांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. 33 चेंडूत 50 धावांची भागिदारी करत पंजाबचा डाव सावरला. प्रभसिमरन याने 19 चेंडूत 22 धावांची खेळी केली. या खेळीत प्रभसिमरन याने चार चौकार लगावले. 

प्रभसिमर बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि अथर्व तायडे यांनी डाव सावरला. अथर्व याने संयमी फलंदाजी केली तर दुसरीकडे लियाम याने धावांचा पाऊस पाडला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अथर्व तायडे आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी 50 चेंडूत  78 धावांची भागिदारी केली. अथर्व तायडे रिटायर्ट बाद होत तंबूत परतला. अथर्व तायडे याने 42 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. अथर्व बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी ढेपाळली. पण दुसऱ्या बाजूला लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकी फटकेबाजी केली. 

जितेश शर्मा याला खातेही उघडता आले नाही. शाहरुख खान सहा धावा काढून बाद झाला. सॅम करन 11 धावांवर तंबूत परतला. हरप्रीत ब्रार शून्यावर धावबाद झाला... राहुल  चहर शून्यावर नाबाद राहिलाय. लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकी झुंज दिली... लियाम लिव्हिंगस्टोन याने अखेरच्या चेंडूपर्यंत लढा दिला. लियाम लिव्हिंगस्टोन याने 48 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 9 षटकार आणि पाच चौकार लगावले. 

दिल्लीकडून ईशांत शर्मा आणि एनरिख नॉर्किया यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. खलील अहदम आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget