IPL 2023 : पृथ्वी शॉने मैदानातच घेतली 'लेडी लक'ची भेट, मुलीने हार्ट इमोजी लावून केले अर्धशतकाचे कौतुक
Prithvi Shaw : लेडी लकमुळे पृथ्वीने अर्धशतक झळकावल्याचे बोलले जातेय.
Nidhi Tapadia Prithvi Shaw : भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग सलामीवीर पृथ्वी शॉ धमाकेदार फलंदाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो. पण पंजाबविरोधातील सामन्यानंतर तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. ते कारण म्हणजे लव्ह लाईफ आहे. होय.. पंजाबविरोधात अर्धशतकी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉ स्टेडिअममधील एका मुलीला भेटला... त्या मुलीचे नाव निधी तापडिया असल्याचे समोर आलेय.
खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या पृथ्वी शॉ याला दिल्ली संघाने प्लेईंग 11 च्या बाहेर बसवले होते. पण जवळपास महिनाभरानंतर त्याला पुन्हा एकदा संधी दिली. यावेळी पृथ्वी शॉ याने दमदार अर्धशतक झळकावले. पृथ्वीच्या प्रत्येक धावेला निधी सपोर्ट करत होती. 54 धावांची खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉ याने निधीची भेट घेतल्याचेही समोर आलेय. लेडी लकमुळे पृथ्वीने अर्धशतक झळकावल्याचे बोलले जातेय.
पृथ्वी शॉ याच्या दमदार अर्धशतकानंतर निधी तापडिया हिने इन्स्टा पोस्ट करत कौतुक केलेय. निधीने पृथ्वी शॉ याचा फोटो पोस्ट केला.. “क्या शो है शॉ.” असे कॅप्शन टाकलेय. त्यासोबत टेडिबियर आणि फायर इमोजीसोबत हार्ट इमोजीही पोस्ट केलेय. निधीने आपल्या स्टोरीमध्ये पृथ्वीला टॅगही केलेय... पृथ्वी शॉ यानेही ती स्टोरी इन्स्टावर शेअर केली.
Nice Celebration... ❤️❤️#prithvishaw #PBKSvDC pic.twitter.com/S9XJkhTonh
— Dipankar Ghoshal (@Deepp007Ghoshal) May 18, 2023
कोण आहे निधी तापडिया ?-
Who is Nidhi Tapadia : निधी तापडिया नाशिकची रहिवासी आहेत. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी झाला. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. निधी विशेषतः इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. निधीने 2016 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली.
निधीने प्रसिद्ध क्राईम शो सीआयडीमध्येही काम केले आहे. याशिवाय 2019 मध्ये निधीने पंजाबी गाणे जट्टा कोका या व्हिडीओमध्ये देखील अभिनय करताना दिसली आहे. निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होती. परंतु याची कोणत्याही प्रकारे पुष्टी झाली नव्हती. मात्र ता पृथ्वी शॉने व्हॅलेंटाईन डे वर एक स्टोरी टाकून सर्व काही क्लिअर झाले होते.
पृथ्वी शॉ याने दिली होती प्रेमाची कबुली -
14 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच यंदाच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मॉडेल निधी तापडियासोबत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने लिहिले की, माझ्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे स्टोरी शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने ती डिलीट केली होती.