CSK vs DC: अंबाती रायडूचा पराक्रम, धोनी-विराटच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Ambati Rayudu : अंबाती रायडूने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केलाय. त्याने धोनी, विराट अन् रोहितच्या यादीत स्थान मिळावलेय.
Ambati Rayudu 200th Match: अंबाती रायडूने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केलाय. त्याने धोनी, विराट अन् रोहितच्या यादीत स्थान मिळावलेय. अंबाती रायडू याचा आज आयपीएलमधील 200 वा सामना सुरु आहे. आयपीएलमध्ये 200 सामने खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत अंबाती रायडूने स्थान पटकावलेय. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे तर सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
आयपीएलमध्ये 200 सामने खेळणाऱ्या खेळाडूमद्ये धोनी, रोहित शर्मा, कार्तिक यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. 200 सामना खेळणारा अंबाती रायडू नववा खेळाडू आहे. विशेषम्हणजे, यामध्ये एकाही विदेशी खेळाडूचा समावेश नाही. आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त सामने खेळणारे सात खेळाडू सध्या खेळत आहेत. तर दोन खेळाडू निवृत्त झाले आहेत.
ATR going double the Ton Distance!🔥#CSKvDC #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/HbwBr8vRM4
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 10, 2023
आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 सामने खेळलेल्या खेळाडूंची यादी... त्याशिवाय 200 सामने कोणत्या संघाकडून खेळल्याचीही माहिती देण्यात आली आहे. विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकाच संघाकडून 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत...पाहूयात संपूर्ण यादी...
1) महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स आणि राइजिंग पुणे सुपर जायंट्स) - 246 सामने, 5074 धावा
2) दिनेश कार्तिक (दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स) - 240 सामने, 4516 धावा
3) रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स) - 238 सामने, 6070 धावा
4) विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - 234 सामने, 7044 धावा
5) रविंद्र जडेजा (राजस्थान रॉयल्स, कोच्ची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्स) - 222 सामने 2615 धावा, 147 विकेट
6) शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स) - 214 सामने, 6593 धावा, 4 विकेट
7) सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्स) - 205 सामने, 5528 धावा आणि 25 विकेट
8) रॉबिन उथप्पा (मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स) - 205 सामने, 4952 धावा
9) अंबाती रायडू (मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स) - 200 सामने 4308 धावा
यंदा रायडूची कामगिरी कशी राहिली ?
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अंबाती रायडूला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 12 सामन्यातील नऊ डावात रायडूने 17 च्या सरासरीने 188 धावा केल्या आहेत. रायडूने 132.58 च्या स्ट्राईक फलंदाजी केली. रायडूने आतापर्यंत सहा षटकार आणि आठ चौकार लगावले आहेत. रायडूची यंदाची सर्वोच्च धावसंख्या 27 इतकी आहे.