(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023: आयपीएल आधीच चेन्नईला मोठा धक्का; बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही, प्रशिक्षकांची माहिती
Ben Stokes not fit to bowl: गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलच्या मोसमाच्या सुरुवातीला गोलंदाजी करणार नसल्याची माहिती सीएसकेचे प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिली.
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2023 चा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेन्नईला (CSK) ला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes ) गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोसमाच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असणार नाही. ही माहिती संघाचे प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स त्रस्त होता. मात्र दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने आपण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका सुरू झाली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं बेन स्टोक्सने सांगितलं होतं.
चार वेळचा चॅम्पियन सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी सांगितलं की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टोक्स हंगामाच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी योग्य नाही. स्टोक्स आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघासाठी फलंदाज म्हणून खेळणार आहे.
माईक हसी पुढे म्हणाले की, "मला वाटते की बेन स्टोक्स स्पर्धेतील पहिल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजी करणार नाही. आशा आहे की स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यावर त्याला गोलंदाजी करता येऊ शकेल."
चेन्नई विरुद्ध गुजरात पहिला सामना रंगणार
महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघ शुक्रवारी (31 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या गुजरात टायटन्स (CSK vs GT) विरुद्ध IPL 2023 मध्ये पहिला सामना खेळेल. CSK संघ पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
31 मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. 31 मार्च ते 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल.
आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत.
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.
ही बातमी वाचा: