चेन्नईच्या ताफ्यात लेफ्ट आर्म गोलंदाज, आकाश सिंहने घेतली मुकेश चौधरीची जागा
CSK in IPL 2023 : दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आयपीएलला मुकणार आहे. त्याजागी 20 वर्षीय आकाश सिंह याची वर्णी लागली आहे.

CSK in IPL 2023 : दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आयपीएलला मुकणार आहे. त्याजागी 20 वर्षीय आकाश सिंह याची वर्णी लागली आहे. चेन्नईने ट्वीट करत आकाश सिंह याच्याबद्दल माहिती दिली आहे. मुकेश चौधरी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याजाही लेफ्ट आर्म गोलंदाज मुकेश चौधरीला सामील करण्यात आले आहे, असे ट्वीटमध्ये चेन्नईने म्हटले आहे. दरम्यान, मुकेश चौधरीआधी अष्टपैलू कायले जेमिसनही आयपीएलमधून बाहेर गेलाय. त्याजाही दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू सिसांदा मागाला याला चेन्नईने ताफ्यात घेतलेय.
🦁 LION ALERT: Akash Singh joins the squad ahead of IPL 2023. #WhistlePodu #Yellove 💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 30, 2023
कोण आहे आकाश सिंह ?
आकाश सिंह टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा भाग होता. 2020 मध्ये अंडर 19 विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाला उपविजेतेपद मिळाले होते. यावेळी आकाश सिंह संहाचा महत्वाचा सदस्य होता. आकाश सिंह याने विश्वचषकात सहा सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय आकाश सिंग 9 लिस्ट ए सामने आणि 5 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. 2021 मध्ये आकाश सिंह राजस्थान रॉयल्स संघाचा (Rajasthan Royals) सदस्य होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आकाश सिंह नागालँड संघाकडून खेळतो. नागालँडकडून खेळताना त्याने पाच सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.
Welcome, Akash Singh to CSK family. pic.twitter.com/kDiobQuvnD
— Johns. (@CricCrazyJohns) March 30, 2023
मुकेश चौधरीची कामगिरी -
आयपीएल 2022 मध्ये 26 वर्षीय मुकेश चौधरीने 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या होत्या. सुरुवातीच्या षटकात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बाद करण्याचे मुकेश चौधरी याचे कौशल्य चेन्नईसाठी फायद्याचे होते. डिसेंबरपासून मुकेश चौधरी दुखापतीचा सामना करत आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यादरम्यान मुकेश चौधरी याला पाठदुखीचा त्रास झाला होता. अद्याप दुखापतीतून तो सावरलेला नाही.. तो यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. बेंगलोर येथीन एनसीएमध्ये तो फिटनेसवर काम करत आहे.
गुजरातसोबत सलामीचा सामना -
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेअमवर आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई संघ आमनेसामने असतील. सर्वात मोठ्या क्रिकेट लीगकडे जगभरातील सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागलेय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.
Players ruled out of IPL 2023: दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलला कोण कोण मुकणार?
मुंबई इंडियन्स - जसप्रीत बुमराह, जाय रिचर्सडन
चेन्नई सुपर किंग्स - मुकेश चौधरी आणि कायले जेमिसन
आरसीबी - विल जॅक्स
दिल्ली - ऋषभ पंत
कोलकाता - श्रेयस अय्यर
पंजाब किंग्स - जॉनी बेअस्टो
राजस्थान - प्रसिद्ध कृष्णा




















