एक्स्प्लोर

Virat Kohli IPL 2023 Century: आयपीएलमध्ये शतकांचा पाऊस... एका आठवड्यात 5 शतकं; कोहली-क्लासेननं जिंकली मनं

IPL 2023 Century: यंदाच्या आयपीएलमध्ये शतकांचा पाऊस पडलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 शतकं लगावण्यात आली आहेत.

Virat Kohli Heinrich Klaasen IPL 2023 Century: IPL 2023 च्या सीझनमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या एका सामन्यात दोन शानदार शतकं झळकावली. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेननं प्रथम शतक झळकावलं. त्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohali) शतक झळकावून आरसीबीला विजय मिळवून दिला.

इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून झाली. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरातनं चेन्नईचा पराभव केला होता. पण यंदाच्या सीझनचं पहिलं शतक दोन आठवड्यांनी म्हणजेच, 14 एप्रिल रोजी झळकावलं. सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकनं नाबाद 100 धावांची खेळी केली होती. 

अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण 3 शतकं झळकावली. पण आता आयपीएलमधील खेळाडू चांगलेच फॉर्मात आले असून गेल्या एका आठवड्यात शतकांचा पाऊस पडला आहे. मे मधलं पहिलं शतक 12 तारखेला झळकावलं. त्यानंतर 18 मे रोजी चौथं आणि पाचवं शतक झळकावलं. म्हणजेच, मे महिन्यात एकूण 5 शतकं झाली. सध्याच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत एकूण 8 शतकं झळकली आहेत. 

गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना रंगला. या एका सामन्यात दोन शानदार शतकं झळकावली. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेननं सर्वात आधी शतकी खेळी खेळली. त्यानंतर विराट कोहलीनं शतक झळकावून आरसीबी संघाला विजय मिळवून दिला.

क्लासेननं खेळली 104 धावांची शतकी खेळी 

दरम्यान, एका आठवड्यात (12 ते 18 मे) एकूण 5 शतकं झळकावली. 18 मे रोजी, सनरायझर्स संघाचा विकेटकिपर फलंदाज हेनरिक क्लासेननं 51 चेंडूत 104 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. क्लासेननं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकार लगावलं. त्याचा स्ट्राइक रेट 203.92 होता.

या आयपीएल सीझनमधील सातवं शतक क्लासेनच्या बॅटमधून झळकलं. चालू सीझनमध्ये शतक झळकावणाऱ्या 8 खेळाडूंपैकी फक्त 2 परदेशी आहेत. त्यापैकी एक क्लासेन आहे, तर दुसरा हैदराबाद संघाचाच हॅरी ब्रूक आहे. यावेळी देखील हैदराबादची टीम आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

दुसऱ्या डावांत कोहलीचं धडाकेबाज शतक 

क्लासेन पाठोपाठ याच सामन्यात विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. बंगळुरूसाठी शानदार शतकी खेळी साकारत कोहलीनं सामनाच फिरवला. कोहलीनं हैदराबादविरुद्ध 63 चेंडूत 100 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्यानं 4 षटकार आणि 12 चौकार मारले. कोहलीचं हे आयपीएलमधील सहावं शतक होतं. त्यानं ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 शतकं ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

यंदाच्या सीझनमध्ये झळकली 8 शतकं 

  • 14 एप्रिल : हॅरी ब्रूक (SRH vs KKR) : 100 धावा 
  • 16 एप्रिल : वेंकटेश अय्यर (KKR vs MI) : 104 धावा
  • 30 एप्रिल - यशस्वी जायसवाल (RR vs MI) : 124 धावा
  • 12 मे : सूर्यकुमार यादव (MI vs GT) :103 धावा
  • 13 मे : प्रभसिमरन सिंह (PBKS vs DC) : 103 धावा
  • 15 मे : शुभमन गिल (GT vs SRH) : 101 धावा
  • 18 मे : हेनरिक क्लासेन (SRH vs RCB) : 104 धावा
  • 18 मे : विराट कोहली (RCB vs SRH) :100 धावा

6 भारतीय खेळाडूंनी झळकावली शतकं 

परदेशी खेळाडू हॅरी ब्रूकनं या सीझनमधील पहिलं शतक झळकावलं असलं तरी त्यानंतर 8 पैकी 6 शतकं भारतीय फलंदाजांनी झळकावली आहेत. वेंकटेश अय्यरनं 16 एप्रिल रोजी भारतीयांमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. त्यानं मुंबई इंडियन्सविरुद्ध 104 धावांची खेळी खेळली होती. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत मुंबई आणि हैदराबादविरुद्ध 2-2 शतकं झळकावली आहेत. व्यंकटेशशिवाय राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जायस्वालनं मुंबईविरुद्ध 124 धावांची खेळी खेळली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget