IPL 2023 Mini Auction: 87 स्लॉट्स अन् 405 खेळाडू; मिनी ऑक्शन संबंधित A टू Z माहिती
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी कोची येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे.
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी कोची येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शार्टलिस्ट केलं. यापैकी 87 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली. दरम्यान, आयपीएलसंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
1) एकूण 991 खेळाडूंची नोंदणी
आयपीएलच्या मिनी ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. ज्यात 714 भारतीय आणि 227 विदेशी खेळाडूंचा समावेश होता.
2) एकूण 405 खेळाडूंचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश
991 खेळाडूंपैकी 10 फ्रेंचायझींनी 369 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडले. याशिवाय, अन्य 36 खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आली. अशाप्रकारे आता एकूण 405 खेळाडूंचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आलाय.
3) 273 भारतीय तर 132 परदेशी खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश
405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडू आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये 4 खेळाडू असोसिएट देशांचे आहेत.
4) 119 खेळाडूंना आंतराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव
या 405 खेळाडूंपैकी एकूण 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. उर्वरित 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत.
5) एकूण 87 जागा रिक्त
10 फ्रेंचायझी संघांमध्ये एकूण 87 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत. यापैकी 30 खेळाडू परदेशी असू शकतात.
6) 19 परदेशी खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी
19 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी आहे. हे सर्व खेळाडू परदेशी आहेत.
7) 20 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी
आयपीएलच्या ऑक्शनमध्ये 11 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, 20 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी आहे.
8) सनरायझर्स हैदराबादकडं सर्वाधिक पैसे शिल्लक
ऑक्शनसाठी 10 फ्रेंचायझी संघाजवळ 206.5 कोटी रुपये आहेत. सर्वाधिक पैसा सनरायझर्स हैदराबादकडे (42.25 कोटी) आहे.
9) कोलकात्याच्या पर्समध्ये सर्वात कमी पेसै शिल्लक
कोलकाताच्या संघाजवळ सर्वात कमी 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर, त्यांच्याकडं 11 स्लॉट रिक्त आहेत.
10) दिल्लीच्या संघात पाच जागा रिक्त
दिल्ली कॅपिटल्सकडं सर्वात कमी स्लॉट म्हणजेच 5 जागा रिक्त आहेत, तर त्यांच्याजवळ ऑक्शनसाठी 19.45 कोटी रुपये शिल्लक आहे.
हे देखील वाचा-