IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार मुंबईत? प्रेक्षकांची उपस्थिती मात्र नसणार
IPL 2022 : आयपीएल 2022 ला काहीच महिने शिल्लक असून लवकरच स्पर्धेचा महालिलाव पार पडणार आहे.
IPL 2022 : बहुचर्चित अशा इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आय़पीएलबद्दल (IPL 2022) एक मोठी माहिती समोर येत आहे. आगामी आयपीएल अर्थात आयपीएल 2022 भारतातच पार पडणार असून मुंबई आणि नवी मुंबईसह गरज पडल्यास पुण्यातील मैदानात सामने खेळवले जाणार असल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान कोरोनाचं संकट अजूनही काय असल्याने या सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती नसणार असल्याचंही ANI ने म्हटलं आहे. यावेळी हे सामने वानखेडे मैदान, मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) मैदान, मुंबई, डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई आणि गरज पडल्यास पुण्यातील क्रिकेट मैदानात खेळवणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ असणार असून यावेळी नव्या दोन संघानी अर्थात लखनौ आणि अहमदाबाद यांनी आपल्या बुक केलेल्या खेळा़डूंची यादी जाहीर केली आहे. इतर संघानी याआधीच रिटेन केलेले खेळाडू सांगितले होते. त्यामुळे लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे कोणते खेळाडू आहेत? हे आता स्पष्ट झाले आहे.
कोणत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (12 कोटी), रवींद्र जाडेजा (16 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज ( 7 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी) अॅनरिच नॉर्टीजे (6.50 कोटी)
सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) सुनील नारायण (6 कोटी)
पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)
लखनौ - केएल. राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉयनिस(9.2 कोटी), रवि बिश्नोई (4 कोटी)
अहमदाबाद - हार्दिक पांड्या(15 कोटी), , राशिद खान(15 कोटी), शुबमन गिल (8 कोटी)
12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात दहा संघ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. यामध्ये खर्च कऱण्यासाठी दहा संघाकडे मोजकी रक्कम शिल्लक आहे. पाहूयात कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली आहे...(Purse remaining for 10 IPL teams:)
पंजाब PBKS - 72 Cr
हैदराबाद SRH - 68 Cr
राज्यस्थान RR - 62 Cr
लखनौ Lucknow - 58 cr
बंगळरू RCB - 57 Cr
अहमदाबाद Ahmedabad - 52 cr
मुंबई MI - 48 Cr
चेन्नई CSK - 48 Cr
कोलकाता KKR - 48 Cr
दिल्ली DC - 47.5 Cr
रिटेन न झालेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे. या यादीमध्ये श्रेयस अय्यर, सुरेश रैना, शिखर धवन यासारख्या दिग्गजांची नावे आहेत.. पाहूयात कोणते खेळाडू लिलावात आपलं नशीब अजमावणार आहेत....
लिलावात असणार हे दिग्गज खेळाडू -
क्रृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, इशान किशन, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स निशम, डि कॉक, सुरेश रैना, ड्युप्लेसिस, सॅम करन, ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, श्रेयस अय्यर, रबाडा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्मिथ, हेटमायर, आवेश खान, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, हर्षल पटेल, नवदीप सैनी, हसरंगा, कायले जेमिसन, मार्करम, शाहरुख खान, मोहम्मद शमी, दिपक हुड्डा, लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, तरबेज शम्सी, इविन लुईस, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, नटराजन, जेसन रॉय, जेसन होल्डर, मुजीब रहमान, मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितेश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नाटगरकोटे, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, शाकीब अल हसन.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएल नको! 'या' स्टार खेळाडूंनी लिलावातून घेतली माघार
- INDvsPAK : 23 ऑक्टोबरला मौका, मौका... क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha