एक्स्प्लोर

IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 1214 खेळाडूंची नोंदणी, कोणत्या देशाचे किती खेळाडू?

IPL Mega Auction 2022: आयपीएल 2022 चं काउंटडाऊन सुरू झालंय. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झालाय. या हंगामात यावर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत.

IPL Mega Auction 2022: आयपीएल 2022 चं काउंटडाऊन सुरू झालंय. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झालाय. या हंगामात यावर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. महत्वाचं म्हणजे, आयपीएल 2022 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी साइन अप केलंय. यात 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल खेळाडूंची नोंदणी 20 जानेवारी 2022 रोजी बंद झाली. 

येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवे संघाचा समावेश झाल्यानं हे मेगा ऑक्शन असणार आहे. दरम्यान, 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि 103 खेळाडू अनकॅप आहेत. तर, 41 खेळाडू कॅप खेळाडू आहेत. 

ट्वीट-

कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवलं नाव
ऑस्ट्रेलिया (59), दक्षिण आफ्रिका (48), वेस्ट इंडीज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29), अफगाणिस्तान (20), नेपाळ (15), अमेरिका (15), बांगलादेश (09), नामिबिया (05), आयर्लंड (03), ओमान (03), झिम्बाब्वे (02), भुटान (01), नेदरलँड्स (01), स्कॉटलँड (01) आणि यूएई (01). 

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनौ ठरला आहे. संजीव गोएंका ग्रुपने तब्बल 7 हजार 90 कोटींना संघ विकत घेतला.  आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे.  तसेच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget