SRH vs RCB, Match Highlights : हसरंगाच्या जाळ्यात अडकली हैदराबाद, बंगळुरुचा 67 धावांनी मोठा विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ वानखेडेच्या मैदानात आमने-सामने उतरणार आहेत.
अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने हैदराबादला 67 धावांनी मात दिली आहे.
वानिंदूने उमरानलाही बाद करत सामन्यात पाच विकेट्स पूर्ण केले आहेत.
8 धावा करुन शशांक सिंहही बाद झाला आहे. वानिंदूनेच ही विकेट घेतली आहे.
जोशने एका षटकात दोन विकेट्स घेतल्या आहेत. राहुलनंतर त्याने कार्तिक त्यागीलाबी बाद केलं आहे.
अर्धशतकी दमदार खेळी करुन राहुल त्रिपाठी बाद झाला आहे. जोश हेझलवुडने त्याची विकेट घेतली आहे.
वानिंदूने तिसरी विकेट घेतली असून त्याने जे सुचितला बाद केलं आहे.
संघ अडचणीत असताना राहुल त्रिपाठीनं मात्र दमदार अर्धशतक ठोकलं आहे. 32 चेंडूत त्याने 54 धावा केल्या आहेत.
29 धावा करुन निकोलस पूरन बाद झाला आहे. त्यालाही वानिंदू हसरंगाने बाद केलं आहे.
SRH vs RCB, Match Live Updates : लागोपाठ विकेट पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या हैदराबादसाठी पूरन आणि राहुल धावून आले. दोघांनी संयमी फलंदाजी करत हैदराबादचा डाव सावरला. हैदराबाद तीन बाद 89 धावा
संघाचा डाव सांभाळणारा मार्करम बाद झाला आहे. वानिंदू हसरंगाने त्याला 21 धावांवर बाद केलं आहे.
आरसीबीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. हैदराबादनं अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसनच्या रुपात पहिल्याच षटकात दोन विकेट्स गमावले आहेत.
अखेरच्या षटकात कार्तिकच्या चौफेर फटकेबाजीमुळे बंगळुरुने 192 धावा करत हैदराबादसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
33 धावा करुन ग्लेन मॅक्सवेल बाद झाला आहे. कार्तिक त्यागीच्या ओव्हरमध्ये एडन मार्करमने त्याचा झेल घेतला आहे.
फाफ आणि मॅक्सवेल दोघेही संघाचा डाव सावरत आहेत. 18 षटकानंतर बंगळुरुचा स्कोर 156 झाला आहे.
48 धावा करुन रजत बाद झाला आहे. जे सुचिथनेच त्यालाही तंबूत धाडलं आहे.
बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने नुकतच अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने रजतसोबत उत्तम भागिदारी रचली आहे.
फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी भागिदारी उभारली आहे.
SRH vs RCB, Match Live Updates : पहिल्याच षटकात विराट कोहली बाद झाल्यानंतर रजत पाटीदार आणि कर्णधार फाफ डु प्लेसिसने डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराट कोहली पुन्हा गोल्डन डकचा शिकार झालाय.
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, एफ. फारुकी, कार्तिक त्यागी, उमरान मलिक
बंगळुरु संघाने नुकतीच नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), रजत पाटीदार, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, माहीपाल लोमरोर, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक.
आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 54 वा सामना सनराजयजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ जवळपास असल्याने पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोघांमध्ये आज लढत चुरशीची होईल.
पार्श्वभूमी
SRH vs RCB, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 54 वा सामना सनराजयजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ जवळपास असल्याने पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोघांमध्ये आज लढत चुरशीची होईल. यंदा हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. बंगळुरुची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक असली तरी हैदराबादचं आव्हानही अजून जिवंत असल्याने आजचा सामना नक्कीच अटीतटीचा होऊ शकतो.
हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना दुपारच्या सुमारास असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये दवाची अडचण देखील होणार नाही. म्हणूनच नाणफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे. पण नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
हैदराबाद संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक.
बंगळुरु संभाव्य अंतिम 11 -
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), रजत पाटीदार, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, माहीपाल लोमरोर, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -