RR vs MI, IPL 2022 : सूर्यकुमार चमकला, मुंबईकडून राजस्थानचा पराभव
RR vs MI, IPL 2022 Live Score : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात तरणार.. मुंबईपुढे राजस्थानचं आव्हान
LIVE
Background
RR vs MI, IPL 2022 Marathi News : प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुंबईचा सामना तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शनिवारी सायंकाळी डी वाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ आठ पराभवासह दहाव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ सहा विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या बटलरला रोखणं मुंबईसाठी कठीण जाऊ शकते. त्याशिवाय यजुवेंद्र चाहलही भेदक मारा करत आहे. पर्पल आणि ऑऱेंज कॅपवर या दोघांचा कब्जा आहे.
मुंबई- राजस्थानची यंदाच्या हंगामातील कामगिरी
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दुसरीकडं राजस्थानच्या संघाला आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
मुंबई- राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला धुळ चाखली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थानच्या संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.
RR vs MI, IPL 2022 : सूर्यकुमार चमकला, मुंबईकडून राजस्थानचा पराभव
RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईचा अर्धा संघ तंबूत, पोलार्ड बाद
RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईला आणखी एक धक्का, तिलक वर्मा बाद
RR vs MI, IPL 2022 Marathi News : सूर्यकुमार यादवनंतर लगेच तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
RR vs MI, IPL 2022 Marathi News : चहलच्या जाळ्यात अडकला सूर्यकुमार, मुंबईला तिसरा धक्का
RR vs MI, IPL 2022 Marathi News : सूर्यकुमारचे अर्धशक, तिलक वर्माचीही फटकेबाजी
RR vs MI, IPL 2022 Marathi News : सूर्यकुमार यादवने अश्विनला षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 2 षटकार पाच चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्माही 27 धावांवर खेळत आहे.