![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2022, RCB vs RR : बंगळुरु विरुद्ध राजस्थान; आजची 'रॉयल' लढत कधी, कुठे पाहाल?
IPL 2022 : आज पुण्याच्या एमसीए मैदानात राजस्थान आणि बंगळुरु या संघात सामना पार पडणार आहे.
![IPL 2022, RCB vs RR : बंगळुरु विरुद्ध राजस्थान; आजची 'रॉयल' लढत कधी, कुठे पाहाल? IPL 2022, RCB vs RCB : When & Where To Watch Live Streaming, Telecast Of Royal challengers bangalore vs Rajsthan Royals IPL 2022, RCB vs RR : बंगळुरु विरुद्ध राजस्थान; आजची 'रॉयल' लढत कधी, कुठे पाहाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/d5dca092066f1c5a2ab76c8686af2a4d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RCB vs RR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (Royal challengers bangalore vs Rajsthan Royals) या दोन संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेचा विचार करता राजस्थानचा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. गुजरात नंतर राजस्थानची कामगिरी यंदा अतिशय उल्लेखनीय असून दुसरीकडे बंगळुरुचा संघ काही सामन्यात खराब कामगिरी केलेली वगळता कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहे. दोघांचा फॉर्म पाहता आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.
आज होणाऱ्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 26 एप्रिल रोजी होणारा रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)