
Rohit Sharma: "एक हंगाम खराब गेला म्हणून आम्ही काय संपलो नाही", मुंबईच्या चाहत्यांचा रोहित शर्माला पाठिंबा
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. या हंगामात सात सामने खेळणाऱ्या मुंबईच्या संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर चेन्नईविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईला तीन विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत मुंबईचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एखादा चमत्कारचं मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत पोहचवू शकतो. सध्या सोशल मीडियाद्वारे मुंबईचे चाहते रोहित शर्माला पाठिंबा देत आहेत. एक हंगाम खराब गेल्यामुळं आम्ही काय संपलो नाही, असं ट्विट करत मुंबईच्या चाहत्यानं इतर संघाला इशारा दिला आहे.
मुंबईचा सलग सातवा पराभव
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं सात सामने खेळले आहे. सर्वांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय.
आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी
आयपीएलच्या गुणतालिकेत मुबईचा संघ तळाशी आहे. मुंबईला पुढील सातही सामन्यात विजय मिळवणे गरजेचं आहे. सर्व सामने जिंकल्यानंतरही मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहचणें निश्चित मानलं जाणार नाही. त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. पुढील एकही सामना गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडणार आहे.
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्विट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्विट-
मुंबईचे पुढील सामने कोणाशी होणार?
मुंबईला आणखी सात सामने खेळायचे आहेत. मुंबईचे पुढील सामने लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्याशी होणार आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
