IPL 2022, KKR vs DC : आज कोलकाता विरुद्ध दिल्ली आमने-सामने; कधी, कुठे पाहाल सामना?
आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार असून यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात पार पडणार आहे.
KKR vs DC : आज आयपीएलच्या मैदानात रंगणारा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) या दोघांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे केकेआरचा संघ यंदा पॉईंट्स टेबलमध्ये 4 पैकी 3 सामने जिंकत पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्लीने तीन पैकी एकच सामना जिंकला असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करणार हे नक्की.
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात नक्की कोणाच्या दिशेने सामना झुकणार हे आतातरी सांगता येणार नसला तरी सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 10 एप्रिल रोजी होणारा हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- IPL 2022, CSK vs SRH Result : चेन्नईचा सलग चौथा पराभव, हैदराबादने 8 विकेट्सनी मिळवला विजय
- IPL 2022: राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha