RR vs CSK, Toss Update : नाणेफेक जिंकत धोनीचा फलंदाजीचा निर्णय, प्रथम फलंदाजी करणार; पाहा आजची अंतिम 11
चेन्नई सुपरकिंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल.
RR vs CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 68 वा सामना आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. आजचा सामना सायंकाळी असूल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण होण्याची शक्यता असतानाही धोनीने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा तगडी फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभी करुन राजस्थानवर दबाव टाकण्यासाठी धोनीने ही रणनीती आखली असवी.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता दोन्ही संघानी एक-एक बदल करत संघ तयार केला आहे. यावेळी राजस्थानचा विचार करता त्यांचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर परतल्याने जे.निशामला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्सने अंबाती रायडूला पुन्हा संघात घेत शिवम दुबेला बाहेर बसवलं आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
राजस्थान अंतिम 11
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल
चेन्नई अंतिम 11
डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), एन. जगदीशन, मिचेल सँटनर, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सिमरनजीत सिंह.
हे देखील वाचा-
- RR vs CSK, Head to Head : राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
- IPL 2022, RR vs CSK : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान मैदानात, तर चेन्नई शेवट तरी गोड करणार का? कधी, कुठे पाहाल सामना?
- GT vs RCB, IPL 2022: गुजरातच्या पराभवामुळं हार्दिक पांड्या भडकला, सांगितलं सामना गमावल्यामागचं मोठं कारण