भज्जीने निवडला ऑल टाइम IPL संघ; कुणाला मिळाली संधी, कोण आहे कर्णधार?
Harbhajan Singh : भज्जीने निवडलेल्या संघात मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाला स्थान दिले नाही. त्याशिवाय गौतम गंभीर, डेविड वॉर्नर आणि केएल राहुल यांच्यासारख्या खेळाडूंना स्थान दिले नाही.
Harbhajan Singh, IPL : यंदा आयपीएलचा 15 वा हंगाम सुरु झाला आहे. 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली होती. आयपीएलला सुरु होईन तब्बल 15 वर्ष झाली आहे. अनेक संकटे आली पण आयपीएल थांबले नाही. काही वर्षी तर करोना महामारी आणि निवडणुकांमुळे होणार नाही, असे वाटले होते. पण आयपीएलमध्ये खंड पडला नाही. निवडणुकीचा व्यत्यय आल्यानंतर आयपीएल दक्षिण आफ्रिकामध्ये झाले तर कोरोनाचं संकट आल्यानंतर युएईमध्ये आयपीएल पार पडले होते. निरंतर 15 वर्षांपासून आयपीएलचा रनसंग्राम सुरुच आहे. आता भारताचा माजी दिग्गज फिरकिपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने ऑल टाइम आईपीएल (IPL) संघ निवडला आहे.
भज्जीने निवडलेल्या संघात मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाला स्थान दिले नाही. त्याशिवाय गौतम गंभीर, डेविड वॉर्नर आणि केएल राहुल यांच्यासारख्या खेळाडूंना स्थान दिले नाही. भज्जीने आपल्या संघाचा कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून एमएस धोनीची निवड केली आहे. भज्जीने आपल्या संघात पाच भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, एम.एस. धोनी, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. वेस्ट विंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही भज्जीने आपल्या संघात स्थान दिलेय.
41 वर्षीय भज्जीने आपल्या ऑल टाईम आयपीएल संघात रोहित शर्मा आणि युनिवर्स बॉस ख्रिस गेल याला सलामिवीर म्हणून निवडले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला निवडले आहे. मध्यक्रममध्ये शेन वॉटसन, एबी डिविलिअर्स आणि धोनीला स्थान दिलेय. धोनी विकेट किपर आणि फलंदाज आशा दुहेरी भूमिकेत असणार आहे. भज्जीने रविंद्र जाडेजा आणि सुनिल नारायन यांना फिरकीपटूची जबाबदारी दिली आहे. भज्जीच्या संघात चार अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी भज्जीने यॉर्कर किंग लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिलेय. यांच्या जोडीला शेन वॉटसन आणि पोलार्ड असतील. त्याशिवाय नारायण, रविंद्र जाडेजा असे पर्यायही उपलब्ध असणार आहेत.
हरभजन सिंहचा ऑल टाइम आयपीएल संघ -
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, शेन वॉटसन, एबी डिविलियर्स, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, कायरन पोलार्ड, सुनील नारायण, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.