IPL Final 2022 : गुजरात-राजस्थानची 'रॉयल' लढत, फायनलमध्ये कुणाचे पारडे जड, काय सांगतात आकडे?
GT vs RR IPL Final 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये फायनल होणार आहे.
GT vs RR IPL Final 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये फायनल होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोन्ही संघात रॉयल लढत होणार आहे. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता रविवारी रात्री या दोन संघामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल 14 वर्षानंतर फायनलमध्ये पोहचलाय. तर गुजरातच्या संघाने आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात फायनलमध्ये धडक मारली आहे.
राजस्थान रॉयल्सची सर्वात मोठी ताकद जोस बटलर आणि युजवेंद्र चहल आहे. या दोघांनी आरसीबीच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय. जोस बटलरने 800 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय. तर चहलने 26 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीी सर्वात मोठी ताकद हीच आहे. यांच्या जोडीला इतर गोलंदाज आणि फलंदाज मदत करत आहेत. गुजरात संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे, प्रत्येक सामन्यात नवीन मॅचविनर आहे. कुण्या एका खेळाडूवर गुजरातचा संघ अवलंबुन नाही. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज.. विजयासाठी पुढे येतात.. कुण्या एका खेळाडूच्या कामगिरीवर हा संघ अवलंबून नाही.. त्यामुळे गुजरातला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय.
साखळी फेरीत दोन्ही संघाची कामगिरी कशी आहे?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदा तुफान फॉर्मात आहे. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. गुजरात टायटन्सने (GT) साखळी सामन्यात दहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले होते. तर चार सामन्यात गुजरातचा फक्त पराभव झाला होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सनेही दमदार कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यात नऊ विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. राजस्थानला क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. तर क्वालिफयर 2 मध्ये आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये प्रवेश केलाय.