DJ Bravo : 'नंबर वन', डीजे ब्राव्होचं नवीन गाणं रिलीज, चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद
DJ Bravo : आयपीएलची सुरुवात होत असतानाच ब्राव्होने आपले नवं गाणे रिलिज केले आहे. नंबर वन असे गाण्याचे बोल आहेत. ब्राव्होचं याआधी डिजे ब्राव्हो हे गाणं आले होतं. हे गाणं अल्पावधीतच प्रसिद्ध झाले होते.

Dwayne Bravo New songs : अष्टपैलू गोलंदाजीबरोबर ड्वेन ब्रोवा आपल्या गाण्यामुळेही चर्चेत असतो. ब्राव्हो सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. आयपीएलची सुरुवात होत असतानाच ब्राव्होने आपले नवं गाणे रिलिज केले आहे. नंबर वन असे गाण्याचे बोल आहेत. ब्राव्होचं याआधी डिजे ब्राव्हो हे गाणं आले होतं. हे गाणं अल्पावधीतच प्रसिद्ध झाले होते.
शनिवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली. कोलकाता आणि चेन्नई यांच्यामध्ये पहिला सामना सुरु झालाय. चेन्नई संघाने पिहल्या सामन्यात वेस्ट विंडिजच्या ड्वेन ब्राव्होला संधी दिली आहे. या सामन्यापूर्वी ब्राव्होनं आपलं नंबर वन हे गाणे रिलीज केले आहे. 'नंबर वन' हे गाणे ब्रावो आणि कॉलिन वेडरबर्न यांनी लिहिले आहे. ब्लॅक शॅडो म्यूजिक कंपनीने या गाण्याला प्रड्युस केले आहे. या गाण्याचं पोस्टर आणि टिझरही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘नंबर वन हे गाणे माझ्यासाठी खास आहे. डान्ससोबतच या गाण्यातील शब्दांचा अर्थ मोठा आहे. नंबर वन हे गाणं माझं दुसरं घर भारतात रिलीज करण्यास खूप उत्सुक आहे. चाहत्यांना हे गाणं नक्कीच आवडेल अशी आशा आहे, असे ब्राव्हो म्हणाला.’
पाहा गाणे...
नंबर वन हे गाणे सर्वांनाच आवडेल. याचं चित्रीकरणही व्यवस्थित करण्यात आले आहे, गाण्याच्या शब्दांमुळे अनेकांना चॅम्पियन बनण्यास प्रेरणा मिळू शकते, असे ब्राव्हो म्हणाला. नंबर वन गाण्यामध्ये ब्राव्होने सिग्नेचर स्टेपही केली आहे. हे गाणं चाहत्यांना आवडले आहे. दरम्यान, ब्राव्होच्या नंबर वन या गाण्याला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. अल्पावधीतच हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. नबर वन या गाण्याला आतापर्यंत 24 हजारपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे. तर 3.4 हजार जणांनी लाईक केले आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
