Delhi Capitals Team Preview : ‘दिल्ली में है दम’, ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का?
Delhi Capitals Team Preview : दिल्लीचा संघ आयपीएल चषकावर नाव कोरेल का? ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Delhi Capitals Team Preview : लागोपाठ तीन वेळा प्ले ऑफमध्ये पोहचल्यानंतरही दिल्लीला आयपीएल चषकावर नाव कोरता आलं नाही. मागील 14 वर्षात दिल्ली संघ फक्त एक वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात बरेच बदल झाले आहेत. नवीन खेळाडू संघात आलेत, काही अनुभवी खेळाडू संघातून बाहेर गेलेत. त्यातच दोन संघाची आणखी भर पडली आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रोमांचक होण्याची शक्यता आहे. यंदा तरी दिल्लीचा संघ आयपीएल चषकावर नाव कोरेल का? ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
IPL 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघाकडे कमी पैसे उपलब्ध होते. पण थोड्या पैशातही दिल्लीने दर्जेदार खेळाडूंना खरेदी केलं आहे. संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा अनुभव आणि जोशवर विश्वास दाखवलाय. ऋषभ पंत हा विश्वास सार्थ करणार का? गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत याची भारतीय संघातील कामगिरी सुधारली आहे. तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न दिल्ली संघ करत आहे.
काय आहे जमेची बाजू?
दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत.
कमकुवत बाजू काय?
मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे. दुखापतीमुळे टी 20 विश्वचषकानंतर एनरिक नॉर्खिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तसेच फिरकी गोलंदाजीही कमकुवत वाटतेय. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव कितपत यशस्वी होतील, याबाबत शंका आहे. कारणस मागील काही वर्षांपासून कुलदीप यादवला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विक्की ओस्तवाल आणि प्रवीण दुबे सारखे भारतीय फिरकी गोलंदाज आहेत, मात्र त्यांच्याकडे अनुभव नाही.
एक्स फॅक्टर काय?
मिचेल मार्श आणि अक्षर पटेल दिल्लीसाठी गेमचेंजर होऊ शकतात. त्याशिवाय ऋषभ पंतची विस्फोटक फलंदाजीही संघासाठी गेमचेंजर होऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
फलंदाज - पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हॅब्बार
गोलंदाज - चेतन साकरिया, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दूल ठाकुर
अष्टपैलू - अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओत्सवाल, मिचेल मार्श
विकेटकीपर- ऋषभ पंत (कर्णधार), केएस भरत, टिम सिफर्ट
फिरकीपटू - कुलदीप यादव, प्रवीण दुबे
कोचिंग स्टाफमध्ये कोण?
रिकी पाँटिंग (मुख्य कोच), शेन वॉटसन, अजीत अगरकर आणि प्रवीण आमरे (सहायक कोच), जेम्स होप्स (वेगवान गोलंदाजी कोच).