IPL 2022, DC vs RCB : आज दिल्लीकरांसमोर बंगळरुचं आव्हान; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आज आयपीएलमध्ये दोन सामने पार पडणार असून दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयस चँलेजर्स बंगळुरु याच्यांत असेल.
DC vs RCB : आज आयपीएलमधील (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs RCB) या दोन संघात सामना पार पडणार आहे. यंदा आरसीबी संघाचा फॉर्म दमदार पाहायला मिळत आहे. त्यांनी 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीने 4 सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले असून दोन गमावले आहेत.
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयस चँलेजर्स बंगळुरु या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत चांगली झेप घेऊ शकतो. दिल्ली आणि बंगळुरुच्या इतिहासाचा विचार करता आतापर्यंत 26 वेळा दोघे आमने सामने आले असून बंगळुरुने सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली 10 विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. एख सामना अनिर्णीत देखील राहिला आहे. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 16 एप्रिल रोजी होणारा हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयस चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयस चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हे देखील वाचा-