एक्स्प्लोर

PBKS vs RCB, Match Highlights: रोमहर्षक सामन्यात पंजाबला नमवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेऑफमध्ये, वाचा कोणी फिरवली मॅच

IPL 2021, PBKS vs RCB: केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबसाठी 91 धावांची सलामी भागीदारी केली होती, पण मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.

Bangalore vs Punjab: शारजामध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2021 च्या 48 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा अत्यंत रोमांचक सामन्यात सहा धावांनी पराभव केला. या विजयासह कोहलीच्या संघाने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 12 सामन्यांत आरसीबीचा हा आठवा विजय आहे. तो 16 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पंजाबची मधली फळीकडून पुन्हा एकदा निराशा
बेंगळुरूकडून 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल यांनी शानदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. यावेळी, असे वाटत होते की पंजाब संघ हा सामना सहज जिंकेल. परंतु, त्यांच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशा केली, ज्यामुळे संघाला सहा धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

पंजाबकडून मयांक अग्रवालने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय केएल राहुलने 39 आणि अॅडम मार्क्रामने 20 धावा केल्या. त्याचवेळी निकोलस पूरन 03, सरफराज खान 00 आणि शाहरुख खान 16 धावांवर बाद झाले. सरतेशेवटी, मोईसेस हेनरिक्स 9 चेंडूत 12 धावा आणि हरप्रीत ब्रार दोन चेंडू 3 धावांवर नाबाद परतले.

युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा बेंगळुरूसाठी सामना जिंकण्याची कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत 29 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय शाहबाज अहमद आणि जॉर्ज गार्टन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

IPL 2021 : ख्रिस गेलसोबत पंजाब संघाने केला दुर्व्यवहार, 'या' माजी कर्णधाराचा आरोप

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. आरसीबीची पहिली विकेट कोहलीच्या रूपात पडली. त्याने 24 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. यानंतर आरसीबीचा डाव अचानक ढासळला आणि त्यांनी दुसरी विकेट 68 वर आणि नंतर तिसरी विकेट 73 धावांवर गमावली. पहिल्यांदा डॅनियल ख्रिश्चन 00 आणि नंतर देवदत्त पॅडकिल 40 धावांवर बाद झाला.

पहिल्या सहा षटकांत कोणत्याही विकेटशिवाय 54 धावा करणाऱ्या आरसीबीने 12 व्या षटकात केवळ 73 धावांवर तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्याने फक्त 33 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून तीन चौकार आणि चार षटकार आले. दुसऱ्या हाफमध्ये मॅक्सवेलचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या. एबीच्या बॅटमधून एक चौकार आणि दोन षटकार आले. शेवटच्या दोन षटकांत आरसीबीला पुन्हा गळती लागली. या दरम्यान मॅक्सवेल 57, एबी 23, शाहबाज अहमद 08 आणि जॉर्ज गार्टन 00 धावांवर बाद झाला. त्याचवेळी हर्षल पटेल 01 आणि केएस भरत 00 वर नाबाद परतला.

पंजाब किंग्जसाठी मोईसेस हेनरिक्सने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 12 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 39 धावांत तीन बळी घेतले. त्याचबरोबर हरप्रीत बराराने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत फक्त 26 धावा दिल्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO
DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO
RR vs GT Live Score IPL 2026 : हिशोब चुकता होणार! घरच्या मैदानावरील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी राजस्थान सज्ज; गुजरातच्या विजयाचा रथ रोखणार का?
RR vs GT Live Update IPL 2026 : हिशोब चुकता होणार! घरच्या मैदानावरील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी राजस्थान सज्ज; गुजरातच्या विजयाचा रथ रोखणार का?
IPL मध्ये दारू पिऊन खेळाडू सामना खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतो BCCIचा नियम
IPL मध्ये दारू पिऊन खेळाडू सामना खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतो BCCIचा नियम
Team India : श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?
श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
Vikas Lawande and Sangram Bhandare: शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Embed widget