(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs DC, 1 Innings Highlight: केकेआरच्या सर्वोत्तम गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 127 वर आटोपला
IPL 2021, KKR vs DC: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) 9 गडी गमावून 127 धावा केल्या आहेत.
IPL 2021, KKR vs DC: कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) चमकदार गोलंदाजीसमोर कर्णधार ऋषभ पंतच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 9 बाद 127 धावा केल्या असून कोलकाताला 128 धावांचे आव्हान दिलं आहे.
दिल्लीसाठी कर्णधार पंतने 36 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही 34 चेंडूत 39 धावा केल्या. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात दिल्लीच्या एकाही फलंदाजाने षटकार मारला नाही.
डावाच्या शेवटच्या षटकात दिल्लीची निराशाजनक कामगिरी झाली. टीम साऊदीने या षटकात रविचंद्रन अश्विनला प्रथम पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांच्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि आवेश खान धावबाद झाला. शेवटच्या षटकात दिल्लीच्या 3 विकेट पडल्या. निर्धारित 20 षटकांत दिल्लीने 9 गड्यांच्या बदल्यात 127 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 39-39 धावांचे योगदान दिले. शिखर धवनने 24 धावा केल्या. या तिघांशिवाय दिल्लीचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
कोलकात्याकडून व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण आणि लॉकी फर्ग्युसनने 2-2 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊदीला एक यश मिळालं.
नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता संघाने दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, ज्याचा केकेआरच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. दिल्ली संघाची नवीन सलामीची जोडी शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या, पण पाचव्या षटकात धवन (24) ला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद करून दिल्लीला पहिला धक्का दिला.
धवन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरला केवळ एक धाव केल्यावर दिग्गज फिरकीपटू सुनील नारायणने त्याला बोल्ड केले. 40 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण कोलकात्याने त्यांना परत येण्याची संधी दिली नाही. 13 व्या षटकात स्मिथला (39) फर्ग्युसननेही बोल्ड केले. शिमरॉन हेटमायर (4) पुढच्याच षटकात अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा बळी ठरला.