एक्स्प्लोर

IPL 2020 MI vs RCB : पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईची बंगलोरशी झुंज; आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन

दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएल मधील सलग तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. मुंबईचा संघ किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात खेळेल.

MI vs RCB : आयपीएल २०२० चा 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजल्यापासून अबुधाबीच्या शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या दोन सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत मुंबईला आरसीबीविरुद्धच्या विजय महत्वाचा ठरणार आहे. तर दुसरीकडे, चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आजचा सामना जिंकून पॉईंट टेबलवर टॉप करण्यास उत्सुक आहे.

दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएल मधील सलग तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. मुंबईचा संघ किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात खेळेल. अशा वेळी ईशान किशन सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. तर तिकडे आरसीबीसुद्धा कोणताही बदल न करता खेळण्यासाठी उतरेल. तरीही प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील कडवी झुंज बुधवारी पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतरही 14 गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झालेल्या बंगलोरचा संघही 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ गुणतालिकेत सुरक्षित असलेल्या या संघांपैकी जो संघ जिंकेल, तो बाद फेरीमधील स्थान पक्के करणार आहे.

Weather Report - हवामान कसे असेल?

अबुधाबीच्या शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हवामान पूर्णपणे क्लिअर असेल. दरम्यान, खेळाडूंना येथे उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Pitch Report खेळपट्टी कशी असेल?

शारजाह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेने अबुधाबीचं शेख जायद इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम वेगळं आहे. आकाराच्या बाबतीत हे खूप मोठं मैदान आहे. या पीचवर बॉल खूप थांबून येतो. अशा परिस्थितीत दोन्ही संघ येथे दोन आघाडीच्या फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतात.

दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियंस- क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, किरॉन (कप्तान), क्रुनाल पांड्या, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - देवदत्त पडिकल, आरोन फिंच, विराट कोहली (कप्तान), एबी डीविलियर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह मान, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, इसुरु उदाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज और युजवेंद्र चहल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar : बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर ExclusiveABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar : बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Embed widget