IPL 2020 : मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये आज आमने-सामने; मुंबईचं आव्हान पेलणार का दिल्ली?
IPL 2020 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आजपासून प्लेऑफच्या लढतींना सुरुवात होणार आहे. आज प्लेऑफमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवण्यात येणार आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये आजपासून प्लेऑफच्या लढतींना सुरुवात होणार आहे. प्लेऑफमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिला प्लेऑफ सामना जिंकणारा संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच या सामन्यात पराभव होणाऱ्या सामन्यासाठी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
पहिल्या प्लेऑफ सामन्याला क्वालिफायरचं नाव देण्यात येतं. कारण या सामन्यात विजय झालेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळतो. 6 नोव्हेंबर शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात दुसरा प्लेऑफ सामना खेळवण्यात येणार आहे. ज्याला एलिमिनेटर असं म्हटलं जातं. शुक्रवारी जो संघ पराभूत होईल त्याचा आयपीएल 2020 मधील प्रवास तिथेच थांबणार आहे.
???? | All you need to know about #MIvDC before we take the field this evening ????????#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/Wsy6WJO82x
— Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020
प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाची लढत रविवारी 8 नोव्हेंबर रोजी एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणाऱ्या संघासोबत होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणाऱ्या प्लेऑफच्या तिसऱ्या सामन्याला क्वालिफायर टू असं म्हटलं जातं. जो संघ क्वालिफायर टूमध्ये विजय मिळवेल त्याची टक्कर क्वालिफायर वन जिंकून फायनल्समध्ये पोहोचलेल्या संघासोबत 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी आयपीएल 2020 च्या सीझनमधील विजयी संघ मिळणार आहे.
It. Doesn't. Get. Any. Bigger. Than. This. ✅
???? QUALIFIER 1 ???? ???? Time: 7:30 PM IST ???? ???? Venue: Dubai International Cricket Stadium ????️ We hope your virtual seats are booked for this blockbuster ????️#MIvDC #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/jpuR0CS9co — Delhi Capitals (Tweeting from ????????) (@DelhiCapitals) November 5, 2020
मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्तम
आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत लढणार आहे. पहिल्या लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला यापूर्वीच्या सामन्यात 5 विकेट्सनी मात दिली होती. तर दुसऱ्या लीगच्या सामन्यात मुंबईने आणखी उत्तम प्रदर्शन करत दिल्लीला 9 विकेट्सनी पराभूत केलं होतं.
आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने शानदार खेळी केली होती. परंतु, त्यानंतर संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यानंतर बंगलोरसोबतच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवत दिल्लीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. त्याआधी दिल्लीला सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.
आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कीरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पैटिंसन/नाथन कुल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर और जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, डेनियल सॅम्स/शिमरन हेटमायर/कीमो पॉल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगीसो रबाडा और एनरिक नॉर्टजे.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL 2020, MI vs DC : आज मुंबई आणि दिल्लीत पहिली प्लेऑफ लढत; कोण मिळवणार तिकीट टू फिनाले?
- IPL 2020: रोहित शर्माने आपण फिट असल्याचे सांगितले, BCCI च्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
- रोहित शर्माला भारतीय संघाबाहेर ठेवल्याच्या मुद्द्यावर रवी शास्त्रींनी सोडलं मौन!
- IPL 2020 : मुंबईवर मात करत सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक; रचला इतिहास
- IPL 2020 | आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर पहिलाच खेळाडू!