IPL 2020 KXIP vs RCB live : किंग्स इलेव्हन पंजाबचं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसमोर 207 धावांचं लक्ष्य
आयपीएलमध्ये (IPL 2020) आज किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे.
LIVE
Background
IPL 2020 | आयपीएल 2020 मध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना रंगणार आहे. मागील वर्षी अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या आरसीबीने या सीजनची सुरुवात चांगली केली आहे. आयपीएल 13 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला आरसीबीने 10 धावांनी पराभूत करुन विजयी सलामी दिली.
पहिल्या सामन्यात पंजाबला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातील पराभव विसरून आज पंजाबला नव्या जोमानं पहिल्या विजयासाठी खेळ करावा लागेल. तर बंगलोरचा संघ दुसरा विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वल येण्यासाठी प्रयत्नशील असेल.
किंग्स इलेवन पंजाबची संभावित प्लेइंग इलेव्हन
किंग्स इलेवन पंजाब - केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन (विकेटकिपर), सरफराज खान, के गौतम, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, मोहम्मद शमी आणि रवि बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची संभावित प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - आरोन फिंच, देवदत्त पड्डिकल, विराट कोहली, एबी डिविलियर्स, जोश फिलिप (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर, नवदीप सॅनी, उमेश यादव, डेल स्टेन आणि युजवेंद्र चहल.