IPL 2020, KXIP vs RR : किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात युनिवर्सल बॉस ख्रिस गेलचं शतक अवघ्या एका धावेमुळे हुकलं. 99 धावांवर ख्रिस गेल जोफ्रा आर्चरने टाकलेल्या चेंडूवर बाद झाला. बाद झाल्यानंतर ख्रिस गेल मात्र खूप रागात दिसत होता. रागाच्या भरात त्याने आपल्या हातातली बॅटही मैदानावर फेकली. त्याच्या याच कृत्यामुळे आता ख्रिस गेल अडचणीत सापडला आहे. ख्रिस गेलला सामन्याच्या फिच्या 10 टक्के दंड भरावा लागणार आहे. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ख्रिस गेलवर ही कारवाई करण्यात आली आहे.



आयपीएल 2020 च्या 50व्या सामन्यात 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 99 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि आठ षटकार लगावले. यासह टी-20 क्रिकेटमध्ये गेलने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये गेलने एक हजार षटकारांचा रेकॉर्ड केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे.





ख्रिस गेल आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. गेल संघात परतल्यानंतर केवळ एकच सामन्यात पंजाबचा पराभव झाला आहे. ख्रिस गेलने आयपीएल 2020 च्या 6 सामन्यांमध्ये 275 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने तीन अर्धशतकं आणि 23 षटकार फटकावले आहेत.


'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने रचला इतिहास! टी -20 क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिला फलंदाज


केवळ एका धावेमुळे ख्रिस गेलचं शतक हुकलं. त्यानंतर नाराज झालेल्या गेलने रागात मैदानावर आपली बॅट फेकून दिली. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या चेंडूवर क्रिस गेल 99 धावांवर क्लिन बोल्ड झाला. काही वेळासाठी रागावलेल्या क्रिस गेलने लगेचच चोफ्रा आर्चरला हात मिळवला. सामन्यानंतर जोफ्रा आर्चरने ट्वीट केलं. त्यामध्ये त्याने सामन्यातील काही फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'तरिही तुम्हीच बॉस आहात.'





दरम्यान, टी -20 क्रिकेटमधील गेलचा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे. कारण या यादीमध्ये किरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डच्या नावावर टी -20 क्रिकेटमध्ये 690 षटकार तर गेलच्या नावावर 1 हजार षटकार आहेत. पोलार्ड गेलपेक्षा खूप मागे आहे, त्यामुळे गेलचा हा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :