IPL 2020 : रॉयल चॅलेंजर बंगलोर विरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली होती. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर नाबाद 79 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू असलेला सूर्यकुमार यादव गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी धमाकेदार खेळी करत आहे. केवळ आयपीएलच नाहीतर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही सूर्यकुमार उत्तम कामगिरी करत आहे. तरिदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादवचं नाव नसल्यामुळे सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.


सूर्यकुमार यादवच्या खेळीने केवळ भारतीय संघातील आजी-माजी खेळाडूच नाहीतर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडूही प्रभावित झाले आहेत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिस हा त्यापैकी एक. स्कॉट स्टायरिसने सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. स्कॉट स्टायरिस एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने सूर्यकुमारला थेट आपल्या देशासाठी खेळण्याची ऑफर दिली आहे. स्टायरिस म्हणाला की, 'जर सूर्यकुमार यादवला आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर तो परदेशात येऊ शकतो.'





रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्धच्या सामन्यात धमाकेदाक खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची अविश्वसनीय फंलदाजी पाहिल्यानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिसने ट्वीट करत म्हटलं की, "जर सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर परदेशात येऊ शकतो. कदाचित न्यूझीलंडमध्येही..."





दरम्यान, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला होता. मुंबई विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली होती. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या होत्या.


महत्त्वाच्या बातम्या :