IPL 2020 : आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा जिंवत ठेवल्यात. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजरा केला. हा सामना जिंकत राजस्थान गुणतालिकेत 12 गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. नेट रनरेट जास्त असल्याने 12 गुणांसह पंजाब चौथ्या स्थानी आहे.
चेन्नई वगळता सर्व संघांना प्ले ऑफची संधी
किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइटरायडर्स या तिन्ही संघांनी 13 पैकी सहा सामने जिंकलेत तर सात सामने गमावले आहेत. तर सनराइजर्स हैदराबादने बारापैकी पाच सामने जिंकलेत, त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे तर चेन्नई बाहेर झाली आहे. आता चेन्नई वगळता सर्व संघांकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यात बंगलोर आणि दिल्लीची बाजू सध्या तरी भक्कम आहे.
दिल्लीला आजचा सामना जिंकणं आवश्यक
आयपीएल 2020 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. तसेच दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. जर आजचा सामना मुंबईने जिंकला तर दिल्लीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास, दिल्लीला आरसीबी विरोधातील सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तरच प्लेऑफचं आव्हान दिल्लीचा संघ गाठू शकतो. तसेच पॉईंट टेबलमधील आपलं पहिलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं असणार आहे.
सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये एन्ट्री
सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री घेती आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला. या पराभवासोबत मुंबईचा संघ आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने आयपीएलच्या या सत्रात एकूण आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.
ऑरेंज कॅपवर राहुलचा कब्जा
आयपीएल 2020 मध्ये 600 पेक्षा अधिक धावा करुन केएल राहुलने ऑरेंज कॅपवर आपला दावा मजबूत केला आहे. राहुलनं या आयपीएलमध्ये 13 सामन्यात 58 च्या सरासरीने 641 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये दोन शतकं झळकावणारा शिखर धवन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शिखरनं 11 सामन्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकं झळकावत 471 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वार्नर आहे. त्यानं 436 धावा केल्या आहेत. रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 424 धावा केल्या आहेत तो चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानावर आरसीबीचा देवदत्त पडिक्कल आहे, त्याने 12 सामन्यात 417 धावा केल्या आहेत.
पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराहमध्ये टक्कर
पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 23 विकेट्स घेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या नंबरवर मुंबईचा जसप्रीत बुमराह आहे. बुमराहनं 12 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहेत, तर पंजाबच्या मोहम्मद शमीने देखील 20 विकेट्स घेतल्या आहे. तर राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनं 9 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत एकच स्पिनर आहे तो म्हणजे आरसीबीचा यजुवेंद्र चहल. यजुवेंद्र चहलनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. तो पाचव्या स्थानी आहे.
IPL 2020 : राजस्थान Points Table मध्ये पाचव्या स्थानी, चेन्नई वगळता सर्व संघांना प्ले ऑफची संधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2020 09:29 AM (IST)
आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
चेन्नई वगळता सर्व संघांकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यात बंगलोर आणि दिल्लीची बाजू सध्या तरी भक्कम आहे.
Photo- IPL/BCCI
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -