मुंबई : स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयपीएलमधला आहे. मैदानात असलेला विराट स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या आपल्या गर्भवती पत्नीला अर्थात अनुष्काला 'जेवलीस का?' असं अॅक्शनद्वारे विचारत आहे. त्यावर अनुष्काही हास्यासह थम्प्स अप करुन उत्तर देताना दिसत आहे.


आयपीएल सध्या यूएईमध्ये सुरु आहे. अनुष्का विराटला सपोर्ट करण्यासाठी यूईएमध्येच आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर संघातील सामन्यादरम्यानचा आहे. त्या सामन्यावेळी अनुष्काने रेड ड्रेस आणि गोल्डन हूप इअररिंग्ज परिधान केले होते.


या व्हिडीओमध्ये विराट अॅक्शनद्वारेच अनुष्काला 'जेवलीस का' असं विचारत आहे. त्यावर स्टॅण्डमध्ये असलेल्या अनुष्काने थम्प्स अप करुन जेवल्याचं सांगते. यानंतर विराट हसू लागतो आणि अनुष्का त्याच्याशी काही बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यादरम्यान असला तरी चाहते तो आता शेअर करत आहेत.





अनुष्का आणि विराट लवकरच आई-बाबा बनणार आहेत. अनुष्का प्रेग्नंट असून जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या बाळाचं आगमन होण्याची शक्यता आहे. प्रेग्नंसीच्या काळात विराट अनुष्काची किती काळजी घेतोय ते या छोट्याशा अॅक्शनमधून दिसतं.


अनुष्का शर्मा कायमच आरसीबी स्टॅण्ड्समध्ये विराट आणि आरसीबीला सपोर्ट करताना दिसते. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विराटच्या अर्धशतकानंतर ती टाळ्या वाजवता आणि त्याला फ्लाईंग किस देतानाही कॅमेऱ्यात कैद झाली होती.


शाहरुखप्रमाणेच 'झीरो'नंतर अनुष्काही सिल्व्ह स्क्रीनपासून दूर
दरम्यान अनुष्काचा शेवटचा सिनेमा 'झीरो' होतो जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ होते. अनुष्का स्क्रीनवरुन काही काळ दूर असली तरी तिच्या प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत बनलेल्या 'पाताल लोक' आणि 'बुलबुल' या वेबसीरिज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. 'पाताललोक' अॅमेझॉन प्राईम तर 'बुलबुल' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. अनुष्कासह शाहरुख खाननेही 'झीरो'नंतर कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही.