IPL 2020, DC vs SRH  : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये आज 47व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर असणाऱ्या दिल्ली आज हैदराबाद विरोधात मैदानात उतरणार आहे. तर सनरायझर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे हैदराबादसाठी आज करो या मरो अशी परिस्थिती आहे.


हैदराबादच्या मधल्या फळीतील खेळाडूंची कामगिरी असमाधानकारक


दोन्ही संघांना आपल्या मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. किंग्स इलेव्हन पंजाब विरोधात खेळवण्यात आलेल्या मागील सामन्यात हैदराबाद विजयाला गवसणी घालेल अशी परिस्थिती दिसत होती. मात्र अवघ्या 127 धावांचं आव्हानही हैदराबाद गाठू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो बाद होताच हैदराबाहच्या मधल्या फळीतील खेळाडू फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत. केन विल्यमसन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याजागी जेसन होल्डरला संघात स्थान देण्यात आलं आहे. होल्डरने गोलंदाजीच आपली छाप सोडली
मात्र फलंदाजीत तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. संघाला आज जर प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर मात्र मधल्या फळीतील खेळाडूंना आपली दमदार खेळी दाखवावी लागणार आहे.


हैदराबादच्या गोलंदाजांचं दिल्लीसमोर आव्हान


आयपीएल 2020 मध्ये संदीप शर्मा, टी नटराजन आणि खलील अहमद यांनी हैदराबादसाठी उत्तम गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये उत्तम कामगिरी केली. स्पिनर्समध्ये राशिद खान दिल्लीसाठी डोकेदुखी ठरू शकतो.


विजय मिळवण्यासाठी दिल्लीचा प्रयत्न


दिल्लीचा मागील सामन्यात कोलकाताने पराभव केला होता. दरम्यान, संपूर्ण सीझनमध्ये संघाने उत्तम खेळी केली आहे. दिल्लीकडे स्पिनर्समध्ये अश्विन आणि अक्षर पटेलची जोडी आणि वेगवान गोलंदाजात रबाडा आणि नॉर्टजेची जोडी हैदराबादसाठी आव्हान ठरणार आहे. फलंदाजांमध्ये गेल्या सामन्यांत पृथ्वी शॉ खेळला नव्हता. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन दोघांनी सामन्याला सुरुवात केली होती. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मार्कस स्टोइनिस यांचाही सामना हैदराबादच्या गोलंदाजांना करावा लागणार आहे.


दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ


अजिंक्य रहाणे/पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायेर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉटर्जे आणि तुषार देशपांडे


सनराइजर्स हैदराबादचा संभाव्य संघ


डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि खलील अहमद.


महत्त्वाच्या बातम्या :