IPL 2020, KKRvsKXIP : किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा हा सलग पाचवा विजय ठरला. कोलकाताने पंजाबसमोर 150 धावाचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने 19 व्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस गेल आणि मनदीप सिंह पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. या विजयासह किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या पराभवासह सामन्यात पाचव्या स्थानावर खाली आला आहे.


मनदीप सिंहने 56 चेंडूत नाबाद 66 केल्या तर ख्रिस गेलने 29 चेंडूत 51 धावा केल्या. याशिवाय केएल राहुलने 25 चेंडूत 28 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती-लॉकी फर्ग्युसनला प्रत्येकी एक विकेट घेतली.


त्याआधी कोलकाताकडून गिलने 57, मॉर्गनने 40 आणि लॉकी फर्ग्युसनने नाबाद 24 धावा केल्या. फर्ग्युसनने 13 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय कोलकाताचा कोणताही फलंदाज काही खास कामगिरी करू शकला नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मोहम्मद शमीने तीन तर ख्रिस जॉर्डनने 2 विकेट घेतल्या. तर अश्विन आणि मॅक्सवेलला 1-1 विकेट घेतली.


महत्त्वाच्या बातम्या :