IPL 2020 : यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्व सामने साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफचे सामने हे पहिल्या चार संघात खेळवले जातात.

5 नोव्हेंबर क्वालिफायर 1 संघ 1 vs  संघ 2  दुबई
6 नोव्हेंबर एलिमिटर संघ 3 vs  संघ 4 अबु धाबी
8 नोव्हेंबर क्वालिफायर 2 क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ vs  एलिमिटर मधील विजेता संघ अबु धाबी
10 नोव्हेंबर अंतिम सामना दोन्ही क्वालिफायर विजेता संघ दोन्ही क्वालिफायर विजेता संघ

प्वाईंट्स टेबलची स्थिती काय? प्ले ऑफच्या शर्यतीतून 'या' तीन संघांचं आव्हान संपुष्टात! 

किंग्स इलेवन पंजाबनं प्ले ऑफच्या रेसमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर  मुंबई इंडियंस 14 गुणांसह आणि +1.252 नेट रन रेटसह पहिल्या नंबरवर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह आणि +0.434 नेट रनरेटसह दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 गुणांसह  +0.092 नेट रन रेटमुळं तिसऱ्या स्थानावर आहे.  केकेआर 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानावरील किंग्स इलेवन पंजाब देखील 10 गुणांसह या रेसमध्ये कायम आहे.

दरम्यान, महिलांच्या Women’s T20 Challenge च्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत शारजामध्ये हे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत.

Women’s T20 Challenge वेळापत्रक  

4 नोव्हेंबर - सुपरनोव्हाज vs व्हेलॉसिटी

5 नोव्हेंबर - व्हेलॉसिटी vs ट्रेलब्लेझर्स

7 नोव्हेंबर - ट्रेलब्लेझर्स vs सुपरनोव्हाज